• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राम गोपाल वर्मांच्या 'Ladaki'मध्ये अ‍ॅक्शनसोबत बोल्डनेसचा तडका, मराठमोळ्या अभिनेत्रीचे जबरदस्त स्टंट्स

राम गोपाल वर्मांच्या 'Ladaki'मध्ये अ‍ॅक्शनसोबत बोल्डनेसचा तडका, मराठमोळ्या अभिनेत्रीचे जबरदस्त स्टंट्स

राम गोपाल वर्मा (Ram Goapl Verma) यांचे प्रत्येक चित्रपट काहीतरी वेगळेपण घेऊन येतात. यावेळीही असंच झालं आहे. नुकताच त्यांच्या बहुचर्चित आणि म्हत्वकांक्षी 'लडकी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 नोव्हेंबर- राम गोपाल वर्मा  (Ram Goapl Verma)  यांचे प्रत्येक चित्रपट काहीतरी वेगळेपण घेऊन येतात. यावेळीही असंच झालं आहे. नुकताच त्यांच्या बहुचर्चित आणि म्हत्वकांक्षी 'लडकी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहूनच प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. राम गोपाल वर्मा यांचा हा चित्रपट सर्वात जास्त बिग बजेट असल्याचं म्हटलं जात आहे. हा पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट आहे.हिंदीमध्ये 'लडकी'  (Ladaki)  तर चायनीजमध्ये 'ड्रॅगन गर्ल' या नावाने हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. ARTSEE मीडिया आणि चायनीज प्रोडक्शन मेजर बिग पीपल निर्मित हा एक इंडो प्रोडक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. नेहमीच्या चित्रपटांना फाटा देत रॅम गोपाल वर्मा यांनी एका अभिनेत्रीला चित्रपटाचं केंद्रबिंदू ठेवलं आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा भालेकरनं अचंबित करणारे मार्शल आर्ट स्टंट केले आहेत. यामध्ये अभिनेत्री अतिशय बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. हा चित्रपट ऍक्शन आणि बोल्डनेसचा संमिश्र तडका असल्याचं दिसून येत आहे. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाद्वारे जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूसली यांना अभिवादन केलं आहे. चित्रपटामध्ये अनेक सुंदर ठिकाणे दिसून येत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण चीन, गोवा आणि मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना आणखीनच रंजक वाटणार आहे. चित्रपटामध्ये काही चायनीज तर काही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार दिसून येत आहेत.ट्रेलरमध्ये अभिनेत्री आपल्या मार्शल आर्टच्या ध्येयाने पछाडलेली दिसत आहे. नैतिकतेने चांगल्या रस्त्यावर चालत असताना काही व्यक्ती तिला नाहक त्रास देतात. त्यामुळे ती आपल्या कलेचा वापर करून त्यांना कशी जेरीस आणते हे यातून पाहायला मिळणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: