Home /News /entertainment /

‘यासाठी मोदींना ऑस्कर द्या’; राम गोपाल वर्मांनी Video शेअर करत उडवली खिल्ली

‘यासाठी मोदींना ऑस्कर द्या’; राम गोपाल वर्मांनी Video शेअर करत उडवली खिल्ली

राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर (oscar 2021) सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स अँड ऑस्कर गोज टू असं म्हणते त्यानंतर...

    मुंबई 22 मे: राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. सत्या, कंपनी, सरकार, रंगीला यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी 90चं दशक गाजवलं होतं. मात्र गेल्या काही काळात ते चित्रपटांपेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं अधिक चर्चेत राहू लागले आहेत. देशभरात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ते रोखठोक प्रतिक्रिया देतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक लक्षवेधी व्हिडीओ शेअर केला आहे. या मॉर्फ व्हिडीओद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi ) खिल्ली उडवली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर (oscar 2021) सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स अँड ऑस्कर गोज टू असं म्हणते त्यानंतर सभागृहात एकच शांतता पसरते. सर्वांच्या नजरा ती कोणाचं नाव घेते यावर खिळून असतात. तेवढ्याच मोदींनी केलेल्या भावूक भाषणाची झलक दाखवली जाते. अन् त्यानंतर तो ऑस्कर मोदींनाच मिळतो. खरं तर हा एक एडिट केलेला मॉर्फ व्हिडीओ आहे. या व्हिडीओद्वारे राम गोपाल वर्मा यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. याचवेळेस करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना रडू कोसळलं होतं. मात्र हा व्हिडीओ पाहून टीकाकारांनी उलट मोदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर #ऑस्कर हा शब्द ट्रेंड होऊ लागला होता. शिवाय या हॅशटॅगखाली मोदींच्या आणखीही काही भाषणांच्या क्लिप ट्रोलर्स शेअर करत होते. याच पार्श्वभूमीवर राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी मोदींना पुन्हा एकदा उपरोधिक टोला लगावला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    पुढील बातम्या