मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /"कंगना महाराष्ट्राची पुढील CM होईल असं दिसतंय आणि जेव्हा असं होईल तेव्हा..."

"कंगना महाराष्ट्राची पुढील CM होईल असं दिसतंय आणि जेव्हा असं होईल तेव्हा..."

अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana ranaut) दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana ranaut) दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana ranaut) दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 09 सप्टेंबर : मुंबई महापालिकेनं (BMC) ऑफिसवर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) संतप्त झाली. तिने शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही थेट निशाणा साधला. शिवाय आधीपासूनच कंगना बॉलिवूडला सातत्याने टार्गेट करत आली आहे. त्यामुळे आता बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी कंगना ही महाराष्ट्राची पुढची मुख्यमंत्री होईल, असं दिसतं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलं आहे. राम गोपाल वर्मा म्हणाले, "कंगना नक्कीच महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री होईल असं दिसतं आहे आणि असं झालं तर सर्व बॉलिवूडवासियांना TIMBEKTOO मध्ये स्थलांतरित व्हावं लागेल"

कंगनाने बीएमसीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष्य केलं. "तू जे केलं ते चांगलं केलं. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझं घमेंड तुटेल. काश्मिरी पंडितांवर काय परिस्थिती आली असेल, याचा अंदाज आज मला आला. अयोध्येवर चित्रपट करेन, काश्मीरवरही करेन. माझ्याबरोबर आज जे झालं, ते चांगलंच झालं", अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.

संतप्त कंगनाने मुंबईला म्हटलं पाक, शिवसेनेची बाबरशी तुलना

मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने हे पाकिस्तान आहे असं म्हटलं. "मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे", असं ट्वीट तिनं केलं.

हे वाचा - "ही तर लोकशाहीची हत्या"; BMC च्या कारवाईनंतर कंगनाने शेअर केला ऑफिसचा VIDEO

कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचं म्हटलं. "मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनलं. तसंच हे ऑफिसही परत तयार होणार आहे", असं कंगना म्हणाली.

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला तुर्तास स्थगिती

दरम्यान, कंगनाच्या ऑफिसवर कारवाई सुरू झाल्याने मुंबईत येताच तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली. कंगनाच्या वकिलांनी घटनास्थळी पोहोचून पालिकेच्या अधिकाऱ्याला कायदेशीर कागदपत्र दाखवलं. तसंच, बांधकाम हे अधिकृत असल्याचा दावाही केला आहे.

हे वाचा - कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची जहरी टीका

खुद्द कंगनाने ही ट्वीट करून बांधकाम अधिकृत असल्याचा दावा केला आहे. कंगनाच्या याचिकेवर गुरुवारी (10 सप्टेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

First published:

Tags: Kangana ranaut