Home /News /entertainment /

‘डी कंपनी’च्या प्रदर्शनानंतर राम गोपाल वर्माने सांगितलं चित्रपटाच्या नावामागचं रहस्य

‘डी कंपनी’च्या प्रदर्शनानंतर राम गोपाल वर्माने सांगितलं चित्रपटाच्या नावामागचं रहस्य

"दाउद गँग ही माझ्यासाठी एखाद्या औद्योगीक कंपनी पेक्षा कमी नाही." राम गोपाल वर्मांनी 'डी कंपनी' (D company) बनवण्या मागचं रहस्य सांगितलं आहे.

  मुंबई 16 मे : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या त्यांच्या नव्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा ‘डी कंपनी’ (D company)  ही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत. तर चित्रपटामागची मूळ संकल्पनाही सांगितली आहे. राम गोपाल वर्मा यांनी नुकतीच डीएनए या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी दाऊदवर तसेच अन्य गँगस्टर्सवर चित्रपट बनवण्यामागचं नेमकं कारण काय. याशिवाय चित्रपटाचं नाव डी कंपनी असं का या सगळ्या प्रश्नांची दिसखुलासपणे उत्तर दिली आहेत. वर्मा यांनी आजवर अनेक गुंड तसेच गँगस्टस्टर शैलीचं चित्रपट निर्माण केले आहेत. यात ‘कंपनी’ (Company), ‘सत्या’ (Satya) अशा चित्रपटांचा समावेश आहे. तर या अशाप्रकारचे अनेक चित्रपट विविध भाषांमध्ये त्यांनी निर्माण केले आहेत. पण शैलीचे चित्रपट बनवण्यामागे नेमकी काय दृष्टी होती. असा प्रश्न विचारल्यानंतर वर्मा म्हणाले, मी स्वतः कधीही गँगस्टर हा शब्द वापरत नाही. मी कधाही सत्या बनवताना गँगस्टर चित्रपट म्हणून त्याकडे पाहिलं नाही. पुढे ते म्हणाले, “माझ्यासाठी हे सगळे लोक एक वेगळ्या स्थितीत एक वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतात त्यांचे हे निर्णय किंवा कृती त्यांना वेगळ्या जगात घेऊण जाते. हे सगळं एखाद्या साखळी प्रक्रियेसारखं आहे. एखाद्या चक्रासारख सुरू आहे. ते सगळे सामान्य लोक असतात, पण ते स्वतःला वेगळ्या गोष्टींत गुंतवतात आणि मग सगळं काही बदलतं. हा एक लोकांवरचा अभ्यास आहे. आणि हाच अभ्यास सत्या आणि कंपनी सारखे चित्रपट बनवतो. मी यांना कधीच गँगस्टर हे नाव देणार नाही.”

  पाहा हिना खानचा Traditional अंदाज; फोटो पाहून तुम्ही देखील पडाल प्रेमात

  पुढे ते म्हणतात, “हे मानवी नाटक अधिक आहे, उदाहरण द्यायचं झालंच तर दाउद गँग ही माझ्यासाठी एखाद्या औद्योगीक कंपनी पेक्षा कमी नाही. कोणताही उद्योजक हा दुरदृष्टी ठेऊन निर्णय घेत असतो. जे दाऊदने ही ठेवली होती. त्यावेळी 80 च्या दशकात मुंबईत अनेक लहान लहान टपोरी गँग्स होत्या पण दाऊद कडे दृष्टी होती. त्याला त्याची टोळी कंपनी मध्ये बदलायची होती. ही कंपनी बिल गेट्सपेक्षा कमी नाही. त्यांची कंपनी अधिकृत आहे आणि ही अनधिकृत. एका माणसाची दृष्टी खूप काही बदलू शकते.” “मला अनेक गोष्टी आकर्षित करतात मग ते गुन्हेगार असो, साधे लोक असोत किंवा राजकारणी किंवा कोणीही, मला फरक पडत नाही. सध्या मी एका प्राण्याच्या जातीवर अभ्यास करत आहे.” राम गोपाल वर्मांचा ‘डी कंपनी’ चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला आहे. तर त्यासाठी त्यांना स्वतःच स्पार्क्स (Sparx ott) हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्मही तयार केला आहे. 15 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Dawood ibrahim, Entertainment

  पुढील बातम्या