मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video : RRR Trailer लॉंचवेळी जेव्हा ज्युनियर एनटीआर म्हणतो, 'आता माझी सटकली...'

Video : RRR Trailer लॉंचवेळी जेव्हा ज्युनियर एनटीआर म्हणतो, 'आता माझी सटकली...'

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'RRR' चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. यावेळीचा ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 डिसेंबर - एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'RRR' चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांची याला चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, 'RRR'च्या ट्रेलर लॉंचदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर (Jr NTR) या व्हिडिओमध्ये बॉलिवू़ड स्टार अजय देवगणच्या एका सुप्रिसद्ध डायलॉगची कॉफी करताना दिसत आहे.

आरआरआर’ चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत आहेत.या ट्रेलर लॉंचदरम्यान अजय देवगण ज्युनियर एनटीआरला त्यांच्या सिंघम सिनेमातील आता माझी सटकली हा डायलॉग शिकवताना दिसला. मग काय ज्युनियर एनटीआरने डोक्याला हात लावत एकदम सिंघम स्टाईल आता माझी सटकली ...हा डायलॉग म्हणाला. मग काय उपस्थित लोक लगेच वन्स मोअर असं जोरात ओरडू लागले.

वाचा : Video : आलियाला विचारलं 'R' तुझ्यासाठी लकी आहे का? लाजून दिलं उत्तर..

ज्युनियर एनटीआर हा साऊथचा सुपरस्टार आहे जो अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या तो त्याच्या आरआरआर या सिनेमामुळे चर्चेत आहे. यासोबतच ज्युनियर एनटीआर महागड्या कारची देखील आवड आहे. त्याच्याकडे खास कार कलेक्शन देखील आहे.

'RRR' च्या ट्रेलर व्हिडिओबद्दल सांगायचे तर, यामध्ये ज्युनियर एनटीआर ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड करताना दिसत आहे. त्याचवेळी, राम चरण ब्रिटिश सरकारच्या अधिकृत सैन्यात नोकरीला आहे. पण हे दोन्ही कलाकार एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी, राम चरण ज्युनियर एनटीआर (Ram charan And Jr NTR) ला अटक करताना दिसतो आणि दुसऱ्या दृश्यात तो ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड करताना दिसतो. यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. यासोबतच अजय देवगणचा 'तान्हाजी' ’ (Tanhaji) वाला लुक आणि अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. हे सर्व फक्त अद्भुत आहे. चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओला अल्पावधीतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood