मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे रकुलप्रीत सिंह; रोमॅंटिक फोटो शेअर करत केला खुलासा

जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे रकुलप्रीत सिंह; रोमॅंटिक फोटो शेअर करत केला खुलासा

आज बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत रकुलने जॅकी भगनानीसोबत आपलं नातं जगजाहीर केलं आहे.

आज बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत रकुलने जॅकी भगनानीसोबत आपलं नातं जगजाहीर केलं आहे.

आज बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत रकुलने जॅकी भगनानीसोबत आपलं नातं जगजाहीर केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,10ऑक्टोबर - अभिनेत्री(Bollywood Actress) रकुलप्रीत सिंग (Rakulpreet Singh) आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.आज आपल्या वाढदवसालाचं या अभिनेत्रीने सर्वांना मोठं सरप्राईज दिलं आहे. रकुलप्रीत सिंगने आपण अभिनेता आणि प्रोड्युसर जॅकी भगनानीसोबत(Jacky Bhagnani) रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वानांच सुखद धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

आज बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत रकुलने जॅकी भगनानीसोबत आपलं नातं जगजाहीर केलं आहे. रकुलने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जॅकीसोबतच आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांनी लाल रंगाचं कलर कॉम्बिनेशन केलं आहे. फोटो शेअर करत रकुलने लिहिलं आहे.'थँक यू माय लव्ह, माझी या वर्षीची मला मिळालेली सर्वात मोठी भेट तू आहेस. माझ्या आयुष्यात येऊन रंग भरल्याबद्दल तुझे खूप आभार. मला न क्षणा-क्षणाला हसवत राहिल्याबद्दल धन्यवाद. महत्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. आणखी खूप आठवणी एकत्र करायच्या आहेत'. असं म्हणत रकुलने जॅकीबद्दल आपलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं आहे.

रकुलने पोस्ट करताच तिच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता आयुष्यमान खुरानाने फोटोवर कमेंट् करत 'तुम्ही दोघं' म्हणत हार्टचं ईमोजी शेअर केला आहे. तर काजल अग्रवाल, राशी खन्नासह इतर अभिनेत्रींनी हार्ट इमोजी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वच चाहत्यांना हा एक सुखद धक्का होता. अनेकांना यावर विश्वास बसत नाहीय. मात्र चाहते आपल्या लाडक्या कलाकरांसाठी फारच खुश झाले आहेत.

(हे वाचा:आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं....)

रकुलसोबतच जॅकीनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हाच फोटो शेअर करत आपल्या खास अंदाजात आपल्या लेडी लव्हला शुभेच्छा दिल्या आहेत. जॅकीने फोटो शेअर करत लिहिलं आहे. 'तुझ्याशिवाय मला दिवस दिवस नाही वाटत. तुझ्याशिवाय कितीही स्वादिष्ट भोजन खाताना मला मज्जा नाही येत. माझ्यासाठी माझं जग असणाऱ्या जगातील सर्वात सुंदर आत्म्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुझ्या हास्यासारखा गोड आणि तुझ्यासारखा सुंदर असुदे. हॅप्पी बर्थडे माय लव्ह'. असं म्हणत जॅकीनेसुद्धा रकुलसोबत आपलं नातं ऑफिशियल केलं आहे. या दोघांनवर कलाकार मित्र आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment