मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला

बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला

बारीक होण्यासाठी राखी (Rakhi Sawant) ची कठोर मेहनत पाहा कोणासारखी होणार राखी.

बारीक होण्यासाठी राखी (Rakhi Sawant) ची कठोर मेहनत पाहा कोणासारखी होणार राखी.

बारीक होण्यासाठी राखी (Rakhi Sawant) ची कठोर मेहनत पाहा कोणासारखी होणार राखी.

  • Published by:  News Digital

मुंबई 9 जून : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. सध्या सातत्याने ती चर्चेत दिसते. आता राखीने तिच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली आहे. तर स्वतः बारिक होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.

राखीचा एक फिटनेस सेंटर मधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती हँडस्टँड करताना दिसत आहे. राखीने स्वतः हा फिटनेस व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये माय योगा असं लिहिलं आहे. त्यामुळे राखीने आता फिटनेसला मनावर घेतल्याचं दिसत आहे. (Rakhi yoga video)

यानंतर तिला अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. तर एकाने लिहिलं आहे, ‘शेहनाझ गिल नंतर तुझंच ट्रान्सफॉर्मेशन होणार’. अभिनेत्री शेहनाझ गिलने (Shehnaz Gill) देखील तिचं वजन कमी केलं होतं. त्यानंतर मात्र ती प्रसिद्धीझोतात आली. त्यामुळे राखीला शेहनाझसारखं व्हायचं आहे का असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

राखीची मेहनत पाहता राखी देखील लवकरच तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसेल यात काहीच शंका नाही. राखी नेहमीच तिचे हटके व्हिडिओस शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रुपातला फोटो शेअर केला होता. याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर ती अनेकदा फिरताना दिसते. त्यामुळे ती सतत विविध कारणांसाठी चर्चेत राहते.

कॅमेरा पाहून तोंड लपवू लागली प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा काय नेमकं काय घडलं

अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी कॉमेडियन जॅमी लिव्हर (Jamie Lever) हिने नुकतीच राखीची मीमिक्री केली होती. ज्यानंतर तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. राखीचा हटके अंदाज त्यात पाहायला मिळाला होता. लवकरच राखी इंडियन आयडलच्या एका भागात देखील दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant