Home /News /entertainment /

‘हे गाणं गा त्रास होणार नाही’; राखी सावंतने शिकवली लस घेण्याची नवी पद्धत

‘हे गाणं गा त्रास होणार नाही’; राखी सावंतने शिकवली लस घेण्याची नवी पद्धत

या लसीकरणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Viral video) या व्हिडीओद्वारे तिनं लस घेण्याची नवी पद्धत आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

  मुंबई 17 जून: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant Video) आपल्या चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी राखी चक्क लसीकरणामुळं चर्चेत आहे. नुकतीच तिनं कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस घेतली. (Coronavirus vaccine) या लसीकरणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Viral video) या व्हिडीओद्वारे तिनं लस घेण्याची नवी पद्धत आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. राखीनं कोविशिल्ड लस घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. लस घेण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती. डॉक्टरांनी तिची भीती दुर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राखीनं आपल्या आगामी म्युझिक अल्बममधील ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे गाणं गायलं. अन् हे गाणं गाताना लस घेतली. जर तुम्हाला देखील लस घेण्याची भीती वाटत असेल तर हे गाणं गा, तुमची भीती दूर होईल असा सल्ला राखीनं या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. HBD: सलमानशी पंगा घेणारी सोना मोहपात्रा झाली बेरोजगार; घर खर्चासाठीही नाहीत पैसे
  ओळखा पाहू हा आहे तरी कोण? अभिनेत्याची विविध रुपं पाहून तुम्ही देखील व्हाल दंग राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला 50 रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Corona vaccination, Rakhi sawant, Shocking video viral

  पुढील बातम्या