Home /News /entertainment /

PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर राखी सावंतने केली खास डिमांड; पाहा मजेशीर VIDEO

PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर राखी सावंतने केली खास डिमांड; पाहा मजेशीर VIDEO

राखी सावंतने अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना(PM Narendra Modi) एक खास संदेश दिला आहे.

  मुंबई, 25 सप्टेंबर- अभिनेत्री राखी सावंतला(Rakhi Sawant) ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी सतत आपल्या मजेशीर गोष्टींमुळे चर्चेत असते. छोटा पडदा असो, बॉलिवूड, किंवा राजकीय गोष्टी राखी प्रत्येक मुद्द्यावर आपल्या मजेशीर अंदाजात उत्तर देत असते. राखी सतत आपल्या अशा वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच राखी सावंतने अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना(PM Narendra Modi) एक खास संदेश दिला आहे.
  विरल भयानीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये राखी सावंत आपल्या नेहमीच्या अंदाजात पापाराझींशी बोलताना दिसून आली. सध्या देशाचे पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर आहेत. याचं पार्शवभूमीवर एका पापाराझीने राखीला विचारलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वॊशिंग्टनमध्ये आहेत. तू त्यांना काय संदेश देशील? राखी तर राखी तर राखी सावंत आहे. तिने आपल्या नेहमीच्या अंदाजात हटके उत्तर दिल. राखी म्हणाली, 'मी मोदींना सांगेन अमेरिकेत असणाऱ्या सर्व भारतीयांना माझं प्रेम द्या. त्यांना सांगा माझं त्यांच्यावर अफाट प्रेम आहे. तसेच राखी पुढे म्हणाली, तुम्ही अमेरिकेत आहातच तर माझ्यासाठी शॉपिंगसुद्धा करा. तसं भारतात सगळंच चांगलं मिळतं पण अमेरिकेत काय चांगलं असतं ते माझ्यासाठी खरेदी करा'. (हे वाचा:मराठमोळ्या रेणुका शहाणेंना इंडस्ट्रीत 34वर्षे पूर्ण; खास VIDEO शेअर करत....) दरम्यान काही मीडियाने राखीला 'बिग बॉस १५' मध्ये पती रितेशची एन्ट्री होणार आहे का याबद्दल प्रश्न केला. यावर उत्तर देत राखी म्हणाली, 'तुमच्या सर्वांसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे. घाई नको लवकरच तुम्हाला मोठं सरप्राईज मिळेल'. यावरून राखी कोणता नवा धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच काहींनी राखीला इतर सेलेब्रेटींसारखं मालदीवला व्हेकेशनला कधी जाणार याबद्दलही विचारणा केली. (हे वाचा:Bigg Boss 15: दिव्या बिग बॉसमध्ये येणार? वरूण सूदने केला खुलासा) गेल्यावर्षी 'बिग बॉस १४' मध्ये राखी सावंतने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. तसेच राखीने आपण पैशासाठी बिग बॉसमध्ये आल्याचं म्हटलं होतं. मात्र राखीच्या येण्याने बिग बॉसमध्ये मनोरंजनाचा तडक लागला होता. राखीने आपल्या वेडेपणाने सर्वांना हसवून लोटपोट केलं होतं. इतकंच नव्हे तर शोमध्ये ती रुबिना दिलॆकचा पती अभिनव शुक्लाच्या हात धुवून मागे लागली होती. सुरुवातीला हे सर्व खूप मजेशीर होत. मात्र नंतर या कारणावरून रुबिना आणि राखीमध्ये वादविवादही पाहायला मिळाले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Narendra modi, Rakhi sawant

  पुढील बातम्या