टॉपलेस होत राखी सावंतनं शेअर केला VIDEO, पतीला म्हणाली...

टॉपलेस होत राखी सावंतनं शेअर केला VIDEO, पतीला म्हणाली...

राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. जेव्हा पासून तिचं लग्न झालं आहे तेव्हा पासून तर ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती बद्दल काही ना काही बोलत असते. पण महत्त्वाचं म्हणजे राखीनं अद्याप तिच्या पतीचा चेहरा दाखवलेला नाही. तिनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक-दोन नाही तर एकून पाच व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती टॉपलेस दिसत आहे.

राखी सावंतनं हे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यात ती टॉपलेस होऊन बॉलिवूड गाण्यांवर लिपसिंक करताना दिसत आहे. तिनं चादरीनं स्वतःला झाकलं असून या व्हिडीओमध्ये ही गाणी ती तिच्या पतीसाठी गात आहे का असा प्रश्न तिचे चाहतेविचारताना दिसत आहेत. मात्र यामध्ये राखीनं कुठेही पतीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही किंवा कॅप्शनमध्येही काहीही लिहिलेलं नाही. पण लोक मात्र तिच्या पतीला पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं तिच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंटमध्ये दिसत आहे.

VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

अशाप्रकारे व्हिडीओ शेअर करण्याची राखीची पहिलीच वेळ नाही. या आधीही तिनं अनेकदा अशाप्रकारे व्हिडीओ आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी छप्पन छुरी या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी राखी तिच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे चर्चेत आली होती. या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं. ज्यानंतर तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं.

माधुरी ते जेनेलिया, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी मुलासाठी घेतला करिअरमधून ब्रेक

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखीच्या खासगी जीवानाबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच राखीनं मुंबईच्या जेडब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये रितेश नावाच्या एका एनआरआय मुलाशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. मात्र यासोबतच तिनं तिच्या नवऱ्याला मीडियासमोर येणं आवडत नसल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यामुळेच तिनं पतीसोबत कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पतीनं तो योग्यवेळी मीडियासमोर येईल असं सांगितलं होतं.

अथिया शेट्टीच्या वाढदिवसाला केएल राहुलनं दिल्या शुभेच्छा, Photo Viral

=================================================================

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

Published by: Megha Jethe
First published: November 7, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading