आता राखी सावंतही बोहल्यावर उभी, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल

आता राखी सावंतही बोहल्यावर उभी, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल

सध्या बाॅलिवूडमध्ये लग्नाचा माहोल आहे. प्रत्येकालाच आता लग्न करावंसं वाटायला लागलंय, असं वाटतंय. त्यातून काॅट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही सुटलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : सध्या बाॅलिवूडमध्ये लग्नाचा माहोल आहे. प्रत्येकालाच आता लग्न करावंसं वाटायला लागलंय, असं वाटतंय. त्यातून काॅट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही सुटलेली नाही.


होय, राखी सावंत लग्न करतेय. तिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक आमंत्रण पत्रिका शेअर केलीय. काॅमेडियन दीपक कलालसोबत लाॅस एंजलिसला हे लग्न आहे. दीपक कलाल इंडियाड गाॅट टॅलेंटमध्ये आला होता. आमंत्रण पत्रिकेनुसार हे लग्न 31 डिसेंबरला आहे.


या पोस्टनंतर राखी आणि दीपकची सोशल मीडियावर सगळे जण थट्टा मस्करी करतायत. त्या सगळ्यांना राखी पुरून उरलीय. ती तिचे आणि दीपकचे व्हिडिओ शेअर करतेय.


View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

View this post on Instagram

Thanks mommy daddy ji I love u both

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी सावंत नेहमीच काही ना काही स्टंटबाजी करत असते. राखी सावंत नुकतीच वुटच्या बिग बाॅस बझमध्ये आली होती. यावेळी राखीनं तिच्या नेहमीच्या स्टाइलनं बरीच चमत्कारिक विधानं केली. तिनं फक्त बिग बाॅसमधल्या स्पर्धकांबद्दल सांगितलं नाही तर तिचा मागचा अनुभव शेअर केला.


या शोचे होस्ट अपारशक्ती खुरानानं राखीला विचारलं, तू जसलीन, श्रीशांत, करवीन आणि दीपिका यांना काय दान करायला सांगशील? यावर राखीचं उत्तर मार्मिक होतं. ती म्हणाली, जसलीननं तर अनुपजींना दान करावं. अनुपजींना मी घेईन. मला त्यांच्याबरोबर शाॅवर घ्यायला आवडेल.


PHOTO : मांग मे सिंदूर आणि कान मे बाली... तरीही मस्तानीची आठवण देणारा दीपिकाचा रिसेप्शन लुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 10:09 AM IST

ताज्या बातम्या