VIRAL VIDEO : निर्माते दरवाजा बंद करून टॅलेंट दाखवायला सांगत असत, राखी सावंतचा गौप्यस्फोट

VIRAL VIDEO : निर्माते दरवाजा बंद करून टॅलेंट दाखवायला सांगत असत, राखी सावंतचा गौप्यस्फोट

या व्हिडिओमध्ये राखीनं तिची बॉलिवूडमधील स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : अभिनेत्री राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. त्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी सावंतनं स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आणि स्थान निर्माण केलं आहे. राखी फक्त एक अभिनेत्रीच नाही तर ती एख चांगली डान्सरही आहे. पण राखीचा बॉलिवूडमधील प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मात्र राखीनं तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना सांगितल्या.

राखी सावंत मागच्या 20 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. मात्र फार कमी लोकांना तिचं खरं नाव माहित आहे. राखीचं खरं नाव नीरू भेडा आहे. पण बॉलिवूमध्ये आल्यानंतर राखीनं हे नाव बदलून राखी सावंत असं केलं. सोशल मीडियावर व्हयरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्वतः राखीनं या गोष्टीचा खुलासा केला.

या व्हिडिओमध्ये राखीनं तिची बॉलिवूडमधील स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. राखी सांगते, 'मी घरातून पळून मुंबईमध्ये आले होते. माझा इथं कोणीही गॉड फादर नाही. या ठीकाणी मी जे काही मिळवलं ते सर्व माझ्या प्रयत्नांनी मिळवलं. माझं खरं नावं नीरू भेडा आहे. ज्यावेळी मी ऑडिशन द्यायला जात असे त्यावेळी निर्माते मला माझं टॅलेट दाखवायला सांगत असत. मला त्यावेळी समजत नसे की ते कोणत्या टॅलेंटबद्दल बोलत आहेत. मी त्यांच्याकडे माझे फोटो घेऊन जात असे तर ते फोटो घेऊन निर्माते दरवाजा बंद करत असत. मी कशी-बशी तिथून बाहेर निघत असे.'

'खुद को बचाओ' कतरिना कैफचा सलमानच्या 'या' अभिनेत्रीला सल्ला

राखी पुढे म्हणाली, 'माझी आई हॉस्पिटलमध्ये आयाचं काम करत असे. आम्ही खूप गरीबीमध्ये दिवस काढले आहेत. कधी कधी आम्हाला दोन वेळचं जेवणही मिळत नसे त्यावेळी आम्ही लोकांनी टाकून दिलेलं अन्न उचलून खात असू. यावेळी राखी खूप भावूक झाली होती. आपली स्ट्रगल स्टोरी सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.'

'या' कारणासाठी सलमान खानला जावं लागलं होतं वर्गातून बाहेर

SPECIAL REPORT : ममतांच्या झिंगाट खासदारांचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

First published: May 30, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading