राखी सावंतचा (Rakhi Sawant) नवरा कोण आहे ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिच्या नवऱ्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कॅमेऱ्यासमोर येण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई, 22 डिसेंबर: बॉलिवूडची कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बिग बॉसच्या सिझन 14 (BIGG BOSS) मध्ये दिसत आहे. बिग बॉसमध्ये राखीच्या येण्यामुळे सध्या भांडणांना ऊत आला आहे. बिग बॉसमधील भानगडींप्रमाणेच राखी सावंत तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. राखी सावंतच्या एका रहस्यामुळेही ती चर्चेत आली आहे. राखी नेहमी असं म्हणते की माझं लग्न झालेलं आहे. पण तिच्या नवऱ्याला अजून कोणीही पाहिलेलं नाही. राखीच्या पतीचं नाव रितेश असं आहे. तो यूकेमध्ये वास्तव्याला असून एक व्यावसायिक आहे.
राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी मोकळेपणाने संवाद साधला. 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझं लग्न आतापर्यंत लपवून ठेवलं होतं, ही माझी चूक होती. मला असं वाटायचं की मी राखीशी माझी ओळख असणं आणि मी राखीशी लग्न करणं हे जर जगाला समजलं तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील. या तुमच्या या माध्यमातून मी हे जगाला सांगू इच्छितो की, माझं राखी सावंतसोबत लग्न झालेलं आहे. तिने माझ्याशी लग्न करुन माझ्यावर उपकारच केले आहेत. राखी अतिशय उत्तम पत्नी आहे. ती एक चांगली मैत्रीणही आहे. मी तिला माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतो. माझ्या निर्णयामुळे ते आमचं लग्न लपवून ठेवण्यात आलं होतं. राखीनेही मला या निर्णयात साथ दिली. मला तिचा अभिमान वाटतो. पण आता मला एक संधी मिळाली आहे, मी ठरवलं आहे की मी सर्वांसमोर येईन आणि माझी ओळख सगळ्यांना सांगेन. मी माझ्या फायदा तोटा बघणार नाही. माझं आणि राखीचं सत्य सर्वांना सांगेन.'
एवढंच नाही तर रितेशने बिग बॉमधील रिकी तांबोळीने राखीबद्दल केलेल्या वक्तवांबद्दल नाराजी दर्शवली. रितेश म्हणाला, ‘मी रिकी तांबोळीविरोधात केसही करू शकतो. पण तसं करणार नाही कारण तो एक गेम शो आहे.’