मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rakhi Sawant: आईच्या निधनानंतर आता राखीचा संसार धोक्यात; हंबरडा फोडत म्हणाली 'माझं लग्न...'

Rakhi Sawant: आईच्या निधनानंतर आता राखीचा संसार धोक्यात; हंबरडा फोडत म्हणाली 'माझं लग्न...'

राखी सावंत

राखी सावंत

एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली तर दुसरीकडे ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली. मागच्या आठवड्यात राखीच्या आईचं निधन झालं. आता राखीचा एक इमोशनल व्हिडीओ चर्चेत आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतीच तिला अटक झाली होती. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण काही काळातच तिची सुटका देखील झाली. एवढंच नाही तर याच काळात राखीने अदिलशी लग्न देखील उरकलं. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली तर दुसरीकडे ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली. मागच्या आठवड्यात राखीच्या आईचं निधन झालं. आता राखीचा एक इमोशनल व्हिडीओ चर्चेत आला आहे.

राखी सावंतने आदिल सोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली. तर दुसरीकडे राखी आपला नवरा म्हणत असलेला आदिल दुर्रानी मात्र या विषयावर मौन बाळगून होता. दरम्यान राखीने आदिल आपल्या फसवत असल्याची आणि आपलं लग्न होऊन त्या गोष्टीतला नाकारत असल्याचे आरोप देखील केले. अशातच आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या भर रस्त्यात ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

हेही वाचा - Alia Bhatt: 'आता मुलगीच माझी पहिली....' आलिया भट्टने करियर बाबत घेतला मोठा निर्णय

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी पापाराझींसोबत बोलतांना आणि भररस्त्यात रडतांना दिसून येत आहे. अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आपलं दुःख व्यक्त करत आहे. राखी म्हणत आहे,' माझं लग्न धोक्यात आहे. मला माझं लग्न वाचवायचं आहे. कोणाला काय मिळतं माझ्या संसारात मध्ये मध्ये करून. लग्न म्हणजे मजाक नाही. माझं लग्न मला वाचवायचं आहे.' तिच्या या व्हिडिओवर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

आईच्या निधनानंतर लगेच संसारावर हे संकट कोसळलेल्या राखीला नेटकरी धीर देताना दिसून येत आहेत. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोहळा मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, राखी सावंतच्या आईचं शनिवारी 28 जानेवारी रोजी निधन झालं. तिच्या आईला ब्रेन ट्युमर होता. तिची आई काही वर्षांपासून आजारी होती. राखी 'बिग बॉस मराठी सीझन 4' मधून बाहेर पडताच तिला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याचंही राखी सावंतने म्हटलं होतं. नुकतेच मुंबईत आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते. महिला मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीची चौकशी केली. दिवसभर चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले. आता राखी लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant