Home /News /entertainment /

Bigg Boss14 : राखी सावंतच्या सर्वात जवळची व्यक्ती स्पर्धक म्हणून येणार?

Bigg Boss14 : राखी सावंतच्या सर्वात जवळची व्यक्ती स्पर्धक म्हणून येणार?

Bigg Boss 14 चा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे. या स्पर्धेत लवकरच आणखी एक नवा स्पर्धक येण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 28 डिसेंबर: बॉलिवूडची कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बिग बॉसच्या सिझन 14 (BIGG BOSS) मध्ये दिसत आहे. बिग बॉसमध्ये राखीच्या येण्यामुळे सध्या भांडणांना ऊत आला आहे. बिग बॉसमधील भानगडींप्रमाणेच राखी सावंत तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. राखी नेहमी असं म्हणते की माझं लग्न झालेलं आहे. पण तिच्या नवऱ्याला अजून कोणीही पाहिलेलं नाही. राखीच्या पतीचं नाव रितेश असं आहे आणि तो लवकरच बिग बॉसच्या घरामध्ये येण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रितेशचं आगमन होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. राखी सावंतचा पती रितेश एका स्पर्धकाच्या रुपात नव्या वर्षात बिग बॉस हाऊसमध्ये दाखल होणार आहे. अशी माहिती खुद्द रितेशकडून मिळत आहे. पण बिग बॉसच्या मेकर्सनी मात्र याबद्दल अजून होकार कळवलेला नाही. राखी सावंतचा पती रितेशने एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की, मला बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये जाण्याची इच्छा आहे. तशी इच्छा मी बिग बॉसच्या मेकर्सकडे व्यक्त केली आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मी बिग बॉसमध्ये जाऊ शकतो. पण ही गोष्ट खरी आहे की मेकर्सनी अजून याबद्दल मला होकार कळवेला नाही. राखीला पाठिंबा द्यायचा आहे रितेश पुढे म्हणतो की, ‘या शोमध्ये मी माझ्यासाठी नाही तर राखीसाठी जाणार आहे. मला कायम राखीच्या पाठिशी उभं रहायचं आहे. ती एक अतिशय उत्तम व्यक्ती आहे आणि मला जगाला हे सांगायचं आहे की, 'आमचं लग्न म्हणजे पब्लिसिटी स्टंट नव्हता.’ आता रितेश बिग बॉसमध्ये खरंच दिसणार की, त्याची मागणी मेकर्स धुडकावून लावणार हे लवकरच समजेल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bigg boss

    पुढील बातम्या