...म्हणून जगासमोर येत नाही राखी सावंतचा पती, स्वत:च केला खुलासा!

...म्हणून जगासमोर येत नाही राखी सावंतचा पती, स्वत:च केला खुलासा!

राखीनं तिच्या पतीची ओळख अद्याप लपवून ठेवली आहे आणि यामागेचं एक विचित्र कारण राखीनं सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. काही दिवसांपासून राखी सावंतन लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र या लग्नाबाबत एक गोष्ट खूपच अजब आहे. ते म्हणजे राखीनंही तिचं लग्न झाल्याचं मान्य केल्यानंतरही तिच्या पतीचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. गळ्यात मंगळसूत्र, भांगात सिंदूर, हातात चुडा घातलेले राखीचे अनेक फोटो आतापर्यंत व्हयरल झाले आहेत. मात्र राखीनं तिच्या पतीची ओळख अद्याप लपवून ठेवली आहे आणि यामागेचं एक विचित्र कारण राखीनं सांगितलं आहे.

नुकतंच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीनं तिचा पती मीडियासमोरं न येण्याचं कारण सांगितलं आहे. ती म्हणाली, ‘माझ्या पतीला मीडिया आवडत नाही. तसेच त्याला कोणाच्याही समोर यायचं नाही. लग्न हे दोन कुटुंबांमध्ये होतं त्यामध्ये जगाला थोडीच बोलवायचं असतं.’ या अगोदर राखीनं तिचा पती डोनाल्ड ट्रम्पसोबत काम करत असल्याचा खुलासा केला आहे. तो ट्रम्प यांच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे असं तिनं म्हटलं होतं.

खलनायक हूँ मैं... SAAHO च्या सर्व व्हिलन्सचे लुक रिलीज, पाहा फोटो

याशिवाय राखीनं आपल्या लव्ह स्टोरी बाबतही सांगितलं होतं. ती म्हणाली, माझी पहिला टीव्ही मुलाखत पाहिल्यावर तो माझा फॅन झाला होता. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर मी देवाकडे खूप प्रार्थना केली की मी त्याची पत्नी व्हावं. आम्ही व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट सुरू केलं आणि त्यानंतर त्यानं मला व्हॉट्स अ‍ॅपवरच प्रपोज केलं. माझे कुटुंबीय खूप उत्साही होते. हॉटोलमध्ये आम्ही हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्याच दिवशी आम्ही अगोदर कोर्टमॅरेज केलं होतं.

66th National Film Award : विकी कौशल-आयुष्यमान खुराना ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

या व्यतिरिक्त स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राखी म्हणाली होती की, ती आता आई होण्याचा विचार करत आहे. तिनं सांगितलं, मी 2020 मध्ये आई होण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राखीनं एनआरआय बीझनेसमन रितेश सोबत लग्न केलं आहे. याआधी तिनं दीपक कल्लालसोबत लग्नाची घोषणा केली होती. या दोघांनीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन लग्नाची बातमी दिली होती. मात्र नंतर ही बातमी खोटी निघाली.

अरेरे! भूक-भूक करत अन्नाच्या शोधात विराट-अनुष्का आले रस्त्यावर, PHOTO VIRAL

===================================================================

VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading