मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राखी सावंतचा जबरा फॅन! एका भेटीसाठी तोडला तिच्या घराचा दरवाजा; अभिनेत्रीची पोलिसांत तक्रार

राखी सावंतचा जबरा फॅन! एका भेटीसाठी तोडला तिच्या घराचा दरवाजा; अभिनेत्रीची पोलिसांत तक्रार

राखीच्या घरी एक विचित्र प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे. राखीच्या जबरा फॅनने (Rakhi Sawant fan) हा प्रकार केला आहे. त्या संदर्भात तिने पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल केला आहे.

मुंबई 14 ऑगस्ट : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या फारच चर्चेत असते. नेहमीच ती माध्यमांशी बोलताना दिसते. तर आता राखीच्या घरी एक विचित्र प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे. राखीच्या जबरा फॅनने (Rakhi Sawant fan) हा प्रकार केला आहे. त्या संदर्भात तिने पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल केला आहे.

दरम्यान एक अज्ञात व्यक्तिने राखीच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घराचा दरवाजा ही तोडून त्याने आत जाण्याचा प्रयत्न केला. राखीने नुकताच याचा खुलासा केला आहे. विरय भायनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत ती बोलत होती.

राखीने सांगितलं की, एका अज्ञात व्यक्ति तिच्या बिल्डींगमध्ये शिरली. तसेच आपला फॅन असल्याचं सागंत त्याने आत प्रवेश केला. तसेच घराचा दरवाजा तोडून आता जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात केवळ घरकाम करणारी मुलगी होती. त्यामुळे ती फारच घाबरली होती. तर त्यावेळी राखी घरी नव्हती.

पुढे तिने सांगतिलं की, घरकाम करणारी मुलगी फारच घाबरली, तिला थोडी जखम देखील झाली. त्यामुळे याविरोधात तिने मुंबईतील ओशिवारा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. राखीने या व्हिडीओत घडलेली हकीकत सांगितली आहे.

HBD: 'माता की चौकी'मध्ये गाणारी गायिका ते बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर! असा होता सुनिधीचा प्रवास

दरम्यान ‘बिग बॉस14’ (Big Boss) नंतर राखी फारच चर्चेत आहे. रोज तिचे नवनवीन व्हिडीओ समोर येतात. तसेच तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स देखील आहेत. नुकतच तिचं ड्रिम मे एन्ट्री हे गाणं प्रदर्शित झालं आहे. याशिवाय अनेक कार्यक्रमांमध्येही ती हजेरी लावत असते.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant