Home /News /entertainment /

VIDEO: ‘असं पाहू नका नजर लागेल...’; राखी सावंतच्या घरात पैशांचा पाऊस

VIDEO: ‘असं पाहू नका नजर लागेल...’; राखी सावंतच्या घरात पैशांचा पाऊस

राखीनं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्या घरात चक्क पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे.

  मुंबई 21 मार्च: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. चित्रविचित्र विधानं आणि अवाक् करणारे व्हिडीओ यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र बिग बॉसच्या 14 (Bigg Boss Season 14) सीझनमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर राखी पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात परतली आहे. ती लवकरच एका नव्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतंच तिनं या आगामी वेब सीरिजचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्या घरात चक्क पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. राखीच्या या आगामी वेब सीरिजचं नाव तवायफ बाजार ए हुस्न (Tawaif Bazaar-E-Husn) असं आहे. या सीरिजच्या चित्रीकरणाचा एक व्हिडीओ राखीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या घरात पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. “काय करतेयस तू?... माझ्या पैशांना असं पाहू नकोस.... तुझी नजर लागेल..” असा डायलॉग तिनं या व्हिडीओमध्ये उच्चारला आहे. या सीरिजचं दिग्दर्शन मारूख मिर्झा करत आहेत. ही सीरिज येत्या डिसेंबरच्या आसपास प्रदर्शित होईल. अवश्य पाहा - अभिनेत्री आहे की जलपरी; पाहा आलिया भट्टचं Underwater फोटोशूट
  राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रेक्षकांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अलिकडेच राखीनं बिग बॉस या शोद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या शोमध्ये ती फायनल राऊंडपर्यंत पोहोचली होती. मात्र आईच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी तिनं बक्षिसातील काही रक्कम घेऊन शो अर्ध्यावरच सोडून दिला. या नव्या सीरिजसाठी चाहत्यांनी राखीला शुभेच्छा दिल्या आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Dance video, Funny video, Rakhi sawant

  पुढील बातम्या