मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BBM4: '...म्हणून माझं लग्न होत नाहीये'; बिग बॉसच्या घरात जाण्याविषयी हे काय म्हणाली राखी सावंत?

BBM4: '...म्हणून माझं लग्न होत नाहीये'; बिग बॉसच्या घरात जाण्याविषयी हे काय म्हणाली राखी सावंत?

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

'बिग बॉस मराठी 4'चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 29 नोव्हेंबर : 'बिग बॉस मराठी 4'चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. नुकतंच बिग बॉसच्या घरात चार वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्या. यातील एक वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणजे राखी सावंत. राखीने घरात येताना राडा घालायला सुरुवात केली.

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर राखीने एक मुलाखत दिली. यामध्ये तिने सांगितलं की तिला दोन्ही बिग बॉसच्या ऑफर मिळाल्या होत्या. हिंदी बिग बॉसची आणि मराठी बिग बॉसचीही. तर ती मराठी असल्यामुळे तिने मराठी बिग बॉसची ऑफर स्विकारली. राखीला विचारण्यात आलं की, बिग बॉस मराठीच्या घरात येणार म्हटल्यावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती. राखी म्हणाली, आई रडायला लागली. ती म्हणाली तुझे बाबा असते तर ते भरपूर आनंदित झाले असते. त्यांची इच्छा होती की मी मराठी बिग बॉसमध्ये यावं. कुटुंबाकडून काय सल्ले मिळाले यावर राखी म्हणाली, माझी आई म्हणाली तू जशी आहे तशीच राहा. आतमध्ये रडू नकोस, माझं जे अशत ते तोंडावरच असतं.

हेही वाचा -  BBM4: 'माझ्यासोबत जे घडलं...'; 'त्या' गोष्टीविषयी बोलताना अपूर्वाला अश्रू अनावर

राखीला घरातील कोणतं काम आवडत नाही याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, आपण घरी किती काम करतो. माझ्या तर हाताची लक्ष्मणरेषाही गेली भांडी घासून. घरी पण भांडी घासते आणि आता काय इथे पण येऊ का भांडी घासायला. यामुळे माझं लग्न होत नाहीये. आता मी बिग बॉसच्या घरात काहीच काम करणार नाही. बसून राहणार, भरपूर मेकअप करणार, चांगले चांगले कपडे घालणार आणि ज्वेलरी घालणार. घरात जाऊन काय बदल करणार विचारल्यावर राखी म्हणाली, मी भरपूर मनोरंजन करणार. मी माझ्या स्टाईलने माझ्या पद्धतीनेच तिथे वागणार.

दरम्यान, विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत या चार जणांची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड सदस्यांनी घरात येताच कोणत्या न कोणत्या सदस्याविषयी टीपणी केली आहे. त्यामुळे आजच्या भागात बिग बॉसच्या घरात काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Rakhi sawant