मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राखी सावंतचा पती रितेशला जीवे मारण्याची धमकी, पत्नीविरोधात गुन्हा दाखल करणार

राखी सावंतचा पती रितेशला जीवे मारण्याची धमकी, पत्नीविरोधात गुन्हा दाखल करणार

आयटम गर्ल राखी सावंतने (Rakhi sawant) तिचा पती रितेशबद्दल सांगितल्यावर प्रेक्षक थक्कच झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रितेशला आधीच एक पत्नी असून तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर -  आयटम गर्ल राखी सावंतने (Rakhi sawant) तिचा पती रितेशबद्दल सांगितल्यावर प्रेक्षक थक्कच झाले होते. नेटिझन्स राखी सावंतच्या लग्नाला पब्लिसिटी स्टंट म्हणत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रितेशला आधीच एक पत्नी असून तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता रितेशने त्याच्या लग्नाबद्दल (Rakhi sawant Husband Ritesh Marriage Life) अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पहिली पत्नी स्निग्धावर रितेशचे गंभीर आरोप

रितेशच्या पहिल्या पत्नीचे नाव स्निग्धा प्रिया आहे. त्याने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याची पहिली पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत गेली होती. रितेश म्हणाला, 'ती जेव्हा माझ्याकडे परत आली तेव्हा मी तिला माझ्या मुलामुळे स्वीकारलं, पण ती पुन्हा निघून गेली.'

वाचा-'तू माझ्यावर कधी प्रेम केलेच नाहीस..', तेजस्वीच्या बोलण्याने करण लागला रडू

रितेशला पहिल्या पत्नीपासून हवाय घटस्फोट

यानंतर राखी सावंतचा पती रितेशने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पहिल्या पत्नीच्या आई-वडिलांकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. परंतु, मुलामुळे मी शांत राहत असल्याचं रितेशनं म्हटलंय. आता रितेश पहिल्या पत्नीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. 'मुलामुळे मी तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, पण यावेळी मी कायदेशीर कारवाई करेन,' असं रितेशने सांगितले. तसेच तो पहिली पत्नी स्निग्धा आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार आहे.

वाचा-Tiger 3 मध्ये कतरिनाला टक्कर देणार ही अभिनेत्री? ऋतिकसोबत केलंय काम

रितेशने पहिल्या पत्नीचे आरोप फेटाळले

रितेशच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत, मात्र त्याने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. 'बिग बॉस 15'मध्ये असल्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकला नाही. 'ती माझ्यासोबत अजिबात राहत नसताना मी तिच्यावर हात कसा उचलू शकतो,' असा सवाल रितेशने केला आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Rakhi sawant, Tv shows