मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rakhi Sawant : 'माझ्याबरोबर पॅचअप कर'; राखीनं पोलीस स्टेशन दाखवताच आदिलनं जोडले हात

Rakhi Sawant : 'माझ्याबरोबर पॅचअप कर'; राखीनं पोलीस स्टेशन दाखवताच आदिलनं जोडले हात

rakhi sawant

rakhi sawant

राखीनं नवऱ्याला पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवल्यानंतर मात्र तो पुन्हा राखीशी पॅचअप करण्याची विनंती करत आहे. राखीनं स्वत:चा याचा खुलासा करत आदिलचे चॅट मीडियाला दाखवलेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी :  अभिनेत्री राखी सावंत आणि नवरा आदिल खान दुर्रानी यांचा वाद सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आला आहे. राखी सावंतनं आदिल खानबरोबर लग्न केलं मात्र त्याचं अफेअर असून तो मला त्रास देतो असा आरोप करत राखीनं आदिलची पोलिसांत तक्रार दाखल केली. राखीच्या तक्रारीनंतर आशिवरा पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतलं आहे. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव देखील राखीनं मीडियासमोर सांगितलं. पोलिसांकडून आदिलची चौकशी सुरू आहे. दरम्यान राखीनं नवऱ्याला पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवल्यानंतर मात्र तो पुन्हा राखीशी पॅचअप करण्याची विनंती करत आहे. राखीनं स्वत:चा याचा खुलासा करत आदिलचे चॅट मीडियाला दाखवलेत.

राखीनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती ओशिवरा पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. आदिलची पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राखीनं सांगितलं, सगळी चौकशी सुरू आहे. त्याला आतमध्ये घेतलं आहे. त्याचा फोन, डाक्युमेंट सगळं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, असं राखीनं सांगितलं.

हेही वाचा - Adil khan durrani: मोठी बातमी! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक; 'हे' आहे कारण

 आदिलची पोलिसात तक्रार केल्यानंतर राखी देखील पोलीस स्टेशनला गेली तेव्हा आदिलनं तिला माझ्याबरोबर पॅचअप करण्याची ऑफर दिल्याचं राखीनं सांगितलं. राखी म्हणाली, 'मला तो आता माझ्याबरोबर पॅचअप करण्याची विनंती करत आहे. सतत मला मेसेज करत आहे की, तक्रार मागे घे मी तुझ्याबरोबर पॅचअप करतो. माझ्या हातापाया पडतोय. त्याने मला खूप त्रास दिलाय. मला खूप मारलंय मी त्याला कधीच माफ करणार नाही'.

राखीने आदिलवर एक्सट्रा मॅरेटिअल अफेअर, घरघुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत.  राखीनं म्हटलं आहे की, 'तो रात्री माझ्या घरी येतो आणि मला मारतो. मी त्याचा हातापाया पडत होते पण त्याने माझ्या पोटात लाथ मारली. माझ्याकडे घराच्या दोन चाव्या आहेत. त्यातील एक चावी त्याच्याकडे आहे. घराची त्याच्याकडे असलेली चावी काढून घ्या हे सांगायला मी पोलीस स्टेशनला आली होती. तो आता माझ्याबरोबर नाहीये. मला पोलीस सुरक्षा पाहिजे कारण आदिल आणि त्याच्या गर्लफ्रेंड माझं काहीही बरं वाईट करू शकतात'.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News