मुंबई, 08 फेब्रुवारी: अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा नवरा आदिल खान दुर्रानी मागच्या अनेक दिवसांनी चर्चेत आहेत. राखीने आदिल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आदिलवर एक्सट्रा मॅरेटिअल अफेअर, घरघुती हिंसाचाराचे आरोप केले होते. राखीच्या तक्रारीनंतर आदिल खानला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात आली. अखेर राखीशी पंगा घेणं आदिललं महागात पडलंय. राखीचा नवरा आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राखी सावंतनं 8 महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर लग्न केलं होतं. लग्नाची बातमी त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली होती. राखीनं आदिलबरोबर लग्न करून धर्म बदलला. स्वत:चं नाव बदलून फातिमा देखील केलं. राखी बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर राखीला मात्र आदिलची सगळी अफेअर्स कळली. तिनं त्याच्याविरोधात आवाज उठवला मात्र तेव्हा आदिलनं तिला मारहाण केली. तिला सोडून जाण्याची धकमी दिली. त्याचप्रमाणे तिची गाडी आणि घरावर ताबा मिळवला.
हेही वाचा - अखेर राखीनं जाहीर केलं लग्नाचं सिक्रेट; ड्रामा क्विनचा नवरा आदिल खान आहे तरी कोण?
Mumbai | Adil Durrani who was arrested by Oshiwara police after a woman actor filed an FIR against him sent to judicial custody by the Andheri court
— ANI (@ANI) February 8, 2023
आदिल खान दुर्रानीवर एक्सट्रा मॅरेटिअल अफेअर, घरघुती हिंसाचाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखीची वकील फाल्गुनी हिनं मीडियाशी बोलताना सांगितलं, आदिलवर लावण्यात आलेल्या कलामांच्या आधारे पोलिसांनी त्याच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं पोलीस कोठडी न देता आदिलला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अजूनही तपास करत आहेत. पोलिसांना आदिलचा रिमांड मिळायला हवा होता. आदिल जेव्हा जामिनासाठी अर्ज करेल तेव्हा आम्ही त्याला विरोध करू असं तिनं सांगितलं.
View this post on Instagram
राखीची वकील पुढे म्हणाली, आदिल खान राखीला मारहाण करायचा. तिचे पैसे चोरायचा. आदिलनं राखीचे काही व्हिडीओ शुट केलेत जे दाखवून तो तिला ब्लॅकमेल करायचा. आदिलवर जे आरोप केलेत त्याची चौकशी करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळेच आम्ही आदिलला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
तर आदिलच्या वकीलांनी राखीवर उटलं आरोप केलेत. त्यांनी म्हटलंय, राखी आदिलला मारहाण करत होती. राखीने आधी आदिलविरोधात आर्थिक फसवणूकीचा आरोप केला होता. आदिल त्याचे कपडे खरेदी करायला गेला तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आदिलनं पैशांचा सगळा हिशोब पोलिसांना दिला आहे. पण त्यानंतर राखीनं पुन्हा एकदा पोलिसांत येऊन आदिल विरोधात मारहाण केल्याचा आरोप केला. हे सगळं चुकीचं आहे आणि आदिल पूर्णपणे निर्दोष आहे. राखीनं प्लान करून आदिलला फसवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News