• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • AAP नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर राखीचा तीव्र संताप ; म्हणाली, 'चड्ढा ची चड्डी ....'

AAP नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर राखीचा तीव्र संताप ; म्हणाली, 'चड्ढा ची चड्डी ....'

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या खूप रागात आहे. कारणही तसंच आहे. काही कारण नसताना राखी सावंतचे नाव राजकारणाच्या आखाड्यात सध्या चर्चेत आले आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर 2021 ; बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या खूप रागात आहे. कारणही तसंच आहे. काही कारण नसताना राखी सावंतचे नाव राजकारणाच्या आखाड्यात सध्या चर्चेत आले आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चड्ढा यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना नवजोत सिंग सिद्धू यांना पंजाबच्या राजकीय अखड्यातील राखी सावंत असे संबोधले आहे. हे प्रकरण शांत होण्याआधीच उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी देखील राखीच्या नाववरून एक वक्तव्य केले आहे. यामुळे राखी सावंतचा पारा चांगलाच चढला आहे. अलीकडेच हृदय नारायण दीक्षित यांनी राखी सावंतच्या कपड्यावरून एका वक्तव्य केले होते, ते म्हणाले होती की, 'जर कोणी कमी कपडे घालून महान बनले असते तर बॉलिवूड कलाकार राखी सावंत महात्मा गांधींपेक्षाही मोठी झाली असती.' त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे व या वक्तव्याचा निषेध देखील केला जात आहे.यासंबंधीत प्रकरणावर राखी सावंतने न्यूज 18 सोबत संवाद साधला. राखी म्हणाली की, त्यांच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचे राखीने न्यूज 18 बोलताना सांगितलं. राखी याप्रकरणी कारवाई करणार आहे. यासोबतच, तिने आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते राघव चड्ढा यांच्या वक्तव्यावरही आपली भूमिका मांडली. ती म्हणाली की, लवकरच मी आप पक्षाविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे आणि पक्षाविरोधात मोहीमही चालविणार आहे. आपच्या विरोधात ग्राउंड लेव्हलपासून सोशल मीडियापर्यंत मोहीम राबवणार असल्याचे देखील राखीने सांगितलं . असा नेता जिंकू कधीच जिंकू नये अशी मी आणि माझी पती अशा करतो, असे देखील तिने स्पष्ट केले. वाचा : यामध्ये Arjun Kapoor च बेस्ट; Malaika arora ने उलगडलं आपलं बेडरूम सिक्रेट यासोबत राखीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राखीने या प्रकरणार तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंतने स्पष्टपणे सांगितले की, राघव चढ्ढा माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहावे. मिस्टर चड्ढा आहेस ना...मग माझं नाव जरी घेतलंस तरी तुझी चड्डी काढायला मला वेळ नाही लागणार.. असा इशारा राखीने दिला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: