मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच राखीचा हायव्होल्टेज ड्रामा; 'या' सदस्यासोबत झाला वाद

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच राखीचा हायव्होल्टेज ड्रामा; 'या' सदस्यासोबत झाला वाद

राखी सावंत

राखी सावंत

'बिग बॉस मराठी 4' खूप रंजक होत चालला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात चार सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 28 नोव्हेंबर : 'बिग बॉस मराठी 4' खूप रंजक होत चालला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात चार सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही मोठं सरप्राईज मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या चार स्पर्धकांचे चेहरे समोर आले असून त्यातील तीन खेळाडूंनी आधीच बिग बॉसचं घर गाजवलेला आहे. तर आता लोकप्रिय चेहरा राखी सावंत घरात राडा घालायला सज्ज झाली आहे. राखीने घरात पाय ठेवताच घरातील एका सदस्यासोबत राडा घातल्याचं आजच्या भागात पहायला मिळणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी घरातील एका सदस्यासोबत राडा घालताना दिसत आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून तेजस्विनी लोणारी आहे. राखीने घरात पाय ठेवताच तिच्या नावाची पाटी पहिल्या क्रमांकावर लावली. तिने तेजस्विनीची पाटी काढून तिची पाटी लावल्यामुळे दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे राखीने पाय ठेवताच घरामध्ये राड्याला सुरुवात झालेली पहायला मिळाली. राखी बिग बॉसच्या घरात आणि कोणताच राडा होणार नाही असं तर पहायला मिळणार नाही.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, राखी तेजस्विनीची पाटी काढून तिची नावाची पाटी लावते. यावर तेजस्विनी म्हणते राखी मॅम पहिले माझ्या नावाची पाटी आहे. यावर राखी म्हणते तू पाटी लावल्यावर तुझी पाटी तोडणार. यानंतर तेजस्विनी म्हणते, मी तुमचं पण तोडणार. राखी म्हणते तुझा एक हात तुटलाय दुसरा पण तुटणार. त्यामुळे आता राखीच्या येण्यामुळे घरात काय नवे ट्विस्ट आणि टर्न येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत या चार जणांची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड सदस्यांनी घरात येताच कोणत्या न कोणत्या सदस्याविषयी टीपणी केली आहे. त्यामुळे आजच्या भागात बिग बॉसच्या घरात काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Rakhi sawant