मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rakhi Sawant: राखी सावंतच्या संसारात 'ती' ची एंट्री; सगळ्यांसमोर केला अदिलचा पर्दाफाश

Rakhi Sawant: राखी सावंतच्या संसारात 'ती' ची एंट्री; सगळ्यांसमोर केला अदिलचा पर्दाफाश

राखी सावंत

राखी सावंत

राखीने आदिल आपल्या फसवत असल्याची आणि आपलं लग्न होऊन त्या गोष्टीतला नाकारत असल्याचे आरोप देखील केले. अशातच आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारीराखी सावंत बऱ्याच दिवसांपासून अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. राखी सावंतवर एकापाठोपाठ एक संकटे येत असल्याचे दिसत आहे. राखी सावंतने आदिल सोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली. तर दुसरीकडे राखी आपला नवरा म्हणत असलेला आदिल दुर्रानी मात्र या विषयावर मौन बाळगून होता. दरम्यान राखीने आदिल आपल्या फसवत असल्याची आणि आपलं लग्न होऊन त्या गोष्टीतला नाकारत असल्याचे आरोप देखील केले. अशातच आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या भर रस्त्यात ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

राखी सावंत तिच्या आईच्या कॅन्सरमुळे आदिलसोबतच्या वैवाहिक जीवनात तिला आलेल्या अडचणींबद्दल बोलू शकली नव्हती. आता आई न राहिल्याने राखी सावंत आदिलच्या विरोधात उघडपणे समोर आली आहे. राखी सावंतने आदिलवर फसवणूक केल्याचा आरोप करत तिच्याकडे आदिलविरुद्ध सर्व पुरावे असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Vanita Kharat Wedding: शुभमंगल सावधान! अखेर सुमितची झाली वनिता; लग्नाचे फोटो आले समोर

राखी सावंतने आदिल खान आणि त्या मुलीला इशारा दिला की ती त्यांचा पर्दाफाश करेल. राखीने सध्या त्या मुलीचे नाव सांगण्यास नकार दिला असून वेळ आल्यावर ती सर्व व्हिडिओ आणि फोटो मीडियाला दाखवेल असे सांगितले. जिममध्ये जाताना राखी सावंतने पापाराझींना या सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने आपले दुःख सांगताना ती ढसाढसा रडली. आदिल तिला घटस्फोट आणि तीन-चार लग्नाची धमकी देत ​​असल्याचा दावाही राखी सावंतने केला आहे. आदिलची कोणतीही मुलाखत घेऊ नका, अशी विनंती राखी सावंतने मीडियाला केली.

राखी सावंत रडत म्हणाली, 'माझ्या अल्लाह, गॉड, देव माझ्या प्रत्येक अश्रूचा बदला घेईल. मला माझा स्वाभिमान आणि माझे लग्न कसे वाचवायचे हे देखील कळते. तरीही इशारा देत आहे. मी उघड करीन मी त्या मुलीला मीडियासमोर इशारा देत आहे, ती माझ्या आणि माझ्या आदिलमध्ये आली तर मी तिला सोडणार नाही. तुला लाज वाटली पाहिजे. एक स्त्री स्त्रीचे घर उद्ध्वस्त करत आहे. तू एक विवाहित स्त्रीचे आयुष्य खराब करत आहात का? देवाचे आभार मान कि मी अजून तुझे नाव घेतलेले नाही. तुझे व्हिडिओ मीडियात व्हायरल झाले नाहीत. '

यानंतर तिने आदीलला देखील इशारा दिला आहे. ती म्हणाली कि, 'आदिल, मी तुलाही एक इशारा देतेय. आतापासून त्या मुलीशी ब्रेकअप कर. जर तू असा विचार करत असशील की मी इतर स्त्रियांप्रमाणे गप्प बसेन. तू मला दोन-चार लग्नाची धमकी दिलीस तर मी ते सहन करणार नाही.'

राखी सावंत म्हणाली की, आदिल फेमस होण्यासाठी तिचा वापर करून घेत आहे. ती आता फक्त आईमुळे गप्प बसली होती. पण आता ती  शांत बसणार नाही.  राखीच्या या खुलास्याने सगळ्यांनाच चकित केले आहे.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant