Home /News /entertainment /

VIDEO: अखेर राखीची इच्छा झाली पूर्ण; Big Boss OTT मध्ये होणार धमाकेदार एंट्री

VIDEO: अखेर राखीची इच्छा झाली पूर्ण; Big Boss OTT मध्ये होणार धमाकेदार एंट्री

राखी रवीवारच्या एपिसोडमध्ये येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राखी सर्वांना घाबरवणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

  मुंबई 22 ऑगस्ट : ‘बिग बॉस ओटीटी’ (Big Boss OTT)  सुरू होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. तर ‘संडे का वॉर’ घेऊन करण जोहर (Karan Johar) रविवारी येणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट्स सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि शेहनाझ गील (Shehnaaz Gill) यांनी उपस्थिती लावली होती. तर आता या आठवड्याचा प्रोमो आला असून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) हजेरी लावणार असल्याचं समजतं आहे. राखीचा हटके अंदाजातील व्हिडीओ बिग बॉसच्या घरात शेअर करण्यात आली आहे. ज्यात ती हटके अंदाजात दिसत आहे. दरम्यान ती रवीवारच्या एपिसोडमध्ये येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राखी सर्वांना घाबरवणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Voot (@voot)

  हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, ‘जुली असो की राखी आता पाहणं बाकी आहे. एन्टरटेन्मेंट क्वीन येत आहे संडे का वॉरमध्ये.’ त्यामुळे राखी मनोरंजन करता करता घाबरवणार देखील आहे. एका आठवड्यासाठी ती गेस्ट म्हणून उपस्थिती लावणार आहे. मागील आठवड्याच सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गील गेस्ट म्हणून आले होते.

  'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्माचा सुपरबोल्ड लुक; PHOTO होतायत VIRAL

  दरम्यान राखी सावंत ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. अनेकदा ती निरनिराळ्या फोटोग्राफर्सशी संवाद साधत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होतात. बिग बॉस सुरू झाल्यानंतर तिने बिग बॉस ओटीटीमध्ये जाण्याची  इच्छा असल्याचं म्हटलं होतं. तर आता राखीची इच्छा पूर्ण होत असल्याचं दिसत आहे. नेहमीच ती निरनिरळ्या पद्धतीने एन्टरटेन्मेंट करताना दिसते. दरम्यान ‘बिग बॉस 14’ मध्येही राखी दिसली होती. सलमान खानने राखीला एन्टरटेनर म्हटलं होतं. त्यामुळे बिग बॉस ओटीटी कन्टेस्टंट्स प्रेक्षकांच मनोरंजन करत नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा आता राखीची धम्माकेदार एन्ट्री काय नवीन घेऊन येणार पाहणं रंजक ठरणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Rakhi sawant

  पुढील बातम्या