मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कोट्यावधींची मालकीण आहे राखी सावंत; पाहा कुठून येतो इतका पैसा

कोट्यावधींची मालकीण आहे राखी सावंत; पाहा कुठून येतो इतका पैसा

  राखी सावंत  (Rakhi Sawant)   हे मनोरंजन (Entertainment) विश्वातलं सतत चर्चेत असणारं नाव. राखी सावंत ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून ओळखली जाते. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधल्या तिच्या परफॉर्मन्सबद्दल खूप चर्चा झाली होती. किंबहुना राखी सावंत या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या आयटम सॉंग्जचीदेखील चर्चा असते. मनोरंजन विश्वाव्यतिरिक्त ती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातूनदेखील सातत्यानं चर्चेत असते.

पुढे वाचा ...

    मुंबई, 25  नोव्हेंबर-   राखी सावंत  (Rakhi Sawant)   हे मनोरंजन (Entertainment) विश्वातलं सतत चर्चेत असणारं नाव. राखी सावंत ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून ओळखली जाते. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधल्या तिच्या परफॉर्मन्सबद्दल खूप चर्चा झाली होती. किंबहुना राखी सावंत या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या आयटम सॉंग्जचीदेखील चर्चा असते. मनोरंजन विश्वाव्यतिरिक्त ती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातूनदेखील सातत्यानं चर्चेत असते. राखी सावंत सोशल मीडियावरून तिचे मजेदार व्हिडिओ शेअर करून चर्चेत राहते. तसंच सामाजिक, राजकीय मुद्द्यांवरचं तिचं भाष्य प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडतं. राखी सावंत फारसे चित्रपट करत नसली, तरी तिच्याकडं कोट्यवधींची संपत्ती आहे. चित्रपटातून फारशी झळकत नसतानाही तिच्याकडं एवढी संपत्ती कशी, तिच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका कोणता असा प्रश्न अनेकांना पडतो. राखी सावंत स्टेज शोजच्या माध्यमातून मोठी कमाई करते. याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

    राखी सावंत विविध कारणांनी सतत चर्चेत असते. चित्रपटांमधून ती फारशी दिसत नसली, तरी सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ पोस्ट करून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. एकूणच चित्रपट क्षेत्रात ती फारशी यशस्वी ठरली नसली, तरी स्टेज शोजच्या माध्यमातून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. या स्टेज शोजच्या माध्यमातून राखी सावंतनं मोठी कमाई केली आहे.राखी सावंतचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईत झाला. तिचे सावत्र वडील आनंद सावंत पोलिस अधिकारी होते. आई जया भेदा या गृहिणी आहेत. शिक्षणानंतर राखी सावंतने फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) प्रवेश केला. सुरुवातीला लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर ती प्रामुख्यानं आयटम सॉंग करू लागली. टीव्हीवरच्या `शादी का स्वयंवर`मुळे ती विशेष चर्चेत आली. मनोरंजन विश्वातलं तिचं संपूर्ण करिअर वादविवादांनी व्यापलेलं आहे.

    मुंबईत राखी सावंत हिचे अनेक फ्लॅट्स आहेत. तिची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. अंधेरी आणि जुहूसारख्या उच्चभ्रू परिसरात तिचे 2 शानदार फ्लॅट्स आहेत. 11 कोटींचा एक बंगलादेखील तिच्याकडे असल्याचं काही माध्यमांच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. राखी सावंतला लक्झरी गाड्यांचीदेखील आवड आहे. तिच्याकडे फोर्डची एंडेव्हर आणि फोक्सवॅगनची पोलो कार आहे. कमाईतला मोठा हिस्सा ती तिच्या राहणीमानासाठी खर्च करते.राखी सावंतच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत स्टेज शोज (Stage Shows) हा आहे. ती देशात, तसंच परदेशांत स्टेज शो करते. तसंच ती रिअॅलिटी शोजमध्येदेखील सहभागी होते. स्पॉन्सरशिपच्या माध्यमातूनही ती पैसा कमावते. लवकरच ती बिग बॉस 15मध्ये (Big Boss 15) तिच्या वडिलांसह सहभागी होणार आहे. `माझ्या आईच्या आजारपणाचा सर्व खर्च अभिनेता सलमान खानने (Salman Khan) केल्यामुळे तो माझ्यासाठी खास आहे,` असं राखी सावंतनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

    First published:

    Tags: Entertainment, Rakhi sawant