मुंबई, 23 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतीच तिला अटक झाली होती. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण काही काळातच तिची सुटका देखील झाली. एवढंच नाही तर याच काळात राखीने अदिलशी लग्न देखील उरकलं. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली तर दुसरीकडे ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली. आता तिने असं पाऊल उचललं आहे ज्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.
राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. एका व्हिडीओत राखी या एनजीओमधल्या मुलांना चिप्स, कुरकुरे आणि लेसचे पॅकेट देताना दिसत आहे. त्यानंतर राखी तिथल्या मुलांना बोलते की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. मग राखी त्या मुलांसोबत मिळून केक कापते. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याशिवाय राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखीच्या हातात 500 रुपयांच्या नोटेचं एक बंडल असल्याचे दिसत आहे. त्यानंतर राखी हे पैसे एनजीओमध्ये असलेल्या मुलांना वाटते.
हेही वाचा - Madhurani Prabhulkar: मधुराणी अनेक वर्षांनी पुन्हा पोहोचली 'त्या' ठिकाणी; भावुक होत शेअर केला व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून राखीची आई जया भेडा रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत राखी आईसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. आता ती प्रार्थनेसाठी एका NGO मध्ये पोहोचली, जिथे तिने मुलांना आईसाठी प्रार्थना करायला सांगितले. या व्हिडिओमध्ये राखी म्हणते, "प्रार्थना आणि औषधामुळेच माणसाला वाचवता येते. माझेही इथे शिक्षण झाले आहे, त्यानंतर राखी सर्व मुलांना ५००-५०० च्या नोटा देते आणि आईसाठी प्रार्थना करायला सांगते.' यादरम्यान राखी रडताना देखील पाहायला मिळते आहे.
View this post on Instagram
राखी सावंतच्या आईला ब्रेन ट्युमर आहे. तिची आई काही वर्षांपासून आजारी होती. राखी 'बिग बॉस मराठी सीझन 4' मधून बाहेर पडताच तिला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याचंही राखी सावंतने म्हटलं होतं. नुकतेच मुंबईत आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते. महिला मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीची चौकशी केली. दिवसभर चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले.
या प्रकरणापूर्वी राखी तिच्या लग्नाबाबत चर्चेचा विषय बनली होती. या जोडप्याने 6 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते, याचा खुलासा नुकताच राखी सावंतने केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर निकाहचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. राखीने लग्नानंतर आपलं नाव आणि धर्म बदलला असून आता अदिलशी लग्नानंतर राखी फातिमा झाली आहे. एवढंच नाही तर आईला हॉस्पिटल मध्ये भेटायला राखी चक्क बुरखा घालून आली. आता तिने
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Marathi entertainment, Rakhi sawant