Home /News /entertainment /

गोरिला गेटअपमध्ये राखी सावंतने केला 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

गोरिला गेटअपमध्ये राखी सावंतने केला 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

राखी सावंतला (Rakhi Sawant) बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी सावंत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. तिचे व्यक्तिमत्व असे आहे की जर पापाराझीने तिला क्लिक केले तर ती त्यांना भरपूरएन्टरटेन्मेंट कन्टेन्ट देते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 12 नोव्हेंबर- राखी सावंतला  (Rakhi Sawant)  बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी सावंत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  (Viral Video) होत असतात. तिचे व्यक्तिमत्व असे आहे की जर पापाराझीने तिला क्लिक केले तर ती त्यांना भरपूरएन्टरटेन्मेंट कन्टेन्ट देते. आता राखी सावंतने सोशल मीडियावर असा धमाका केला आहे, ज्यानंतर लोकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
  राखी सावंतने इन्स्टाग्रामवर आपला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत गोरिलाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने पिवळा दुपट्टाही घेतला आहे. या गोरिला गेटअपमध्ये माधुरी दीक्षितच्या 'चोली के पीचे क्या है' या प्रसिद्ध गाण्यावर ती डान्स करत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ही मी आहे राखी सावंत. राखी सावंतचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरलदेखील होत हाये. त्याला आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांनी लाइक केले आहे. गोरिल्ला गेटअपमध्ये राखी सावंत ज्या पद्धतीने डान्स करत आहे, ते फक्त राखी सावंतच करू शकते. तिच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने लिहिले आहे- 'लव्ह यू क्वीन'. त्याच वेळी, टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने कमेंटमध्ये एक हसणारा इमोजी शेअर केला आहे. (हे वाचा:BB15' मधून OUT होताच व्हेकेशनवर निघाले मायशा-ईशान; लव्ह बर्ड्सचा एयरपोर्ट VIDEO ) राखी सावंतची ही स्टाईल लोकांना फारच आवडते. ती तिच्या बोल्ड व्यक्तिमत्वामुळे चर्चेत असते. मागच्या वर्षी राखी सावंत बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. राखी सावंतची अशीच स्टाईल बिग बॉसमध्येही पाहायला मिळाली होती. तिने बॉसमध्येही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. सलमान खाननेसुद्धा तिला एन्टरटेनर स्पर्धक म्हटलं होतं. तिने अभिनव शुक्लासोबतही अशीच काहीशी मजामस्ती केली होती. मात्र हा विषय वाढल्यानंतर अभिनवची पत्नी रुबिना दिलैक राखी सावंतवर प्रचंड भडकली होती वाददेखील झाला होता. मात्र राखी सावंत तर राखी सावंत आहे, ती सतत असंच काहीसं करून लोकांचं मनोरंजन करत असते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Rakhi sawant

  पुढील बातम्या