राखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण

राखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण

राखीला कोरोना (Coronavirus)कधीच होऊ शकणार नाही असं विचित्र विधान तिनं केलं आश्चर्याची बाब म्हणजे यामागचं कारणही आणखी विचित्र आहे. ते कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

  • Share this:

मुंबई 6 मे: राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार यावेळेसही घडला आहे. अलिकडेच तिनं वृत्तमाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी तिनं तिला कोरोना (Coronavirus) कधीच होऊ शकणार नाही असं विचित्र विधान केलं आश्चर्याची बाब म्हणजे यामागचं कारणही आणखी विचित्र आहे. ते कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

असं काय म्हणाली राखी?

लोखंडवाला येथील एका कॉफी शॉपबाहेर राखीनं पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. त्यावेळी ती म्हणाली तिला किंवा तिच्या कुटुबीयांना कधीच कोरोना होऊ शकणार नाही. कारण तिच्या शरीरात येशू ख्रिस्त यांचं रक्त आहे. या पवित्र रक्ताला कुठल्याच विषाणूची लागण होऊ शकत नाही. तिचं हे अजब उत्तर ऐकून एकच हास्यकल्लोळ झाला. यापुढे तिनं कंगणा रणौतच्या ट्विटर हँडल सस्पेंशनवरही भाष्य केलं.

चाहत्यांसाठी सुरेल भेट; लतादीदी-किशोरदांचं अनपब्लिश गाणं हिमेश रेशमिया करणार रिलिज

“कंगनाचं अकाउंट बंद झालं याचा आनंदच आहे. कारण ती समाजात निव्वळ द्वेष पसरवण्याचं काम करत होती. याची शिक्षा तिला मिळाली.” असं राखी म्हणाली. राखीचे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राखीच्या विधानांचं कौतुक केलंय तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: May 6, 2021, 5:02 PM IST

ताज्या बातम्या