मुंबई, 12 जानेवारी : बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली आहे. राखी चर्चेत नाहीये असं कधीही झालेलं नाहीये. राखीनं बिग बॉसमधून बाहेर येताच लग्न केल्याची माहिती समोर आली. राखीनं बॉयफ्रेंड अदिलबरोबर कोर्ट मॅरेज केलं. पण हे लग्न सात महिन्याआधीच झाल्याचं समोर आलं. दरम्यान राखीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्न केल्याचं जाहिर केलं. पण कहानीत ट्विस्ट यावा तसा राखीनं आदिल आमचं लग्न मान्य करत नसल्याचं सांगितलं. आदिलनं राखीबरोबर झालेल्या लग्नाला नकार दिला. तर दुसरीकडे राखी आणि आदिलच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात आता राखीच्या भावानं या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देत नवे खुलासे केले आहेत.
राखीनं मे महिन्यात आदिल खान दुरारीबरोबर कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीनं निकाह केली. दोघांच्या निकाहचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल दोघेही अत्यंत खूश असल्याचं दिसत आहे. पण राखी आणि आदिल यांनी लग्नाची बातमी जवळपास सात महिने लवपून ठेवली. पण लग्नानंतर आदिल माझ्याशी बोलत नाही. लग्न करूनही तो इतर मुलींबरोबर अफेअर करत आहे. म्हणून मी आमचं लग्न सर्वांसमोर आणलं, असं राखीनं सांगितलं.
हेही वाचा - Rakhi Sawant: लग्नानंतर राखी सावंतने बदललं आपलं नाव; समोर आलं अभिनेत्रीचं नवं नाव
टेलि टॉकला दिलेल्या मुलाखतीत राखीच्या भावाने राकेशनं सांगितलं की, 'राखी आणि आदिल यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नाबद्दल संपूर्ण कुटुंबाला माहिती होतं. आदिल भाईच्या म्हणण्यानुसार आम्ही इस्लामिक धर्मानुसार लग्न केलं होतं. आमचं संपूर्ण कुटुंब आता चिंतेत आहे. राखी आमच्यात सर्वात लहान आहे. याआधीही तिला राकेशनं फसवलं तेव्हापासून खूप टेन्शनमध्ये आहे. तिच्याबाबतीत पुन्हा असं का होतंय असा प्रश्न आम्हाला पडला आहे'.
View this post on Instagram
राखीचा भाऊ पुढे म्हणाला, 'आदिलनं विचार करून बोललं पाहिजे. त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर एकत्र बसून यावर चर्चा केली पाहिजे. अशानं राखीचं नाव खराब होत आहे. याआधीही राकेशनं तिचा वापर करून घेतला. राखी सध्या खूप स्ट्रेसमध्ये आहे. यात ती स्वत:च्या जीवाचं बरं वाईट करून नाही घेणार याची भिती वाटते'. राखीनं लग्नानंतर नाव बदललं का ? याविषयी राखीचा भाऊ म्हणाला, 'नाही याबाबत मला काही माहिती नाही. त्यांच्यात वैयक्तिकरित्या काही झालं असेल तर याची मला कल्पना नाही'.
त्याचप्रमाणे आदिलविरोधात कोर्टात काही अॅक्शन घेणार का? असं विचारल्यानंतर राखीचा भाऊ म्हणाला, 'आम्ही आता तरी कोर्टात जाण्याचा कोणताही विचार करत नाही. आम्हाला राखी आणि आदिल यांनी एकत्र राहावं असं वाटतं. राखीला आदिल खूप आवडतो. जर दोघांमधल्या गोष्टी ठिक नाही झाल्या तर आम्ही कोर्टात जाऊ. दोन्ही कुटुंबासमोर त्यांचं लग्न झालं आणि आता तो लग्न नाकारतोय'. दरम्यान आदिलकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News