मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video: कोणासाठी राखी झाली ‘दिवानी मस्तानी’; पाहा राखी सावंतचा नवा ड्रामा

Video: कोणासाठी राखी झाली ‘दिवानी मस्तानी’; पाहा राखी सावंतचा नवा ड्रामा

मुंबईच्या रस्त्यांवर राखी शोधतेय तिच प्रेम. राखी बनली दिवानी मस्तानी.

मुंबईच्या रस्त्यांवर राखी शोधतेय तिच प्रेम. राखी बनली दिवानी मस्तानी.

मुंबईच्या रस्त्यांवर राखी शोधतेय तिच प्रेम. राखी बनली दिवानी मस्तानी.

  • Published by:  News Digital

मुंबई 29 मे : बॉलिवूडची ड्रामा गर्ल राखी सावंत  (Rakhi Sawant) कधी काय करेन काही सांगता येत नाही. बोल्ड, बिनधास्त स्वभावाची राखी सध्या सोशल मीडियावर सगळ्याचंच भन्नाट मनोरंजन करताना दिसतेय. कधी ती पीपीई किट घालून भाजी आणयला जाते. तर कधी आणखीनच काही. आता तर चक्क राखीही कोणाच्या तरी प्रेमात दिवानी झालेली दिसत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर राखीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती मस्तानी बनली आहे. व तिचं प्रेम मुंबईच्या रसत्यांवर शोधत आहे. राखीने ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटातील मस्तानीबाईचा लूक केला आहे. व मुंबईच्या रस्त्यांवर ती तिचं प्रेम शोधत आहेत. (Rakhi in Mastani look)

पुढे राखीने असही म्हटलं आहे. ‘झलक दिख ला जा’ शो सुरू करा ज्यातून तरी मला माझा पती मिळेल.

HBD: बॅकस्टेज आर्टिस्ट झाला 'कारभारी लयभारी'; पाहा निखिल चव्हाणचा अभिनय प्रवास

याशिवाय आणखी एक व्हिडीओ आहे ज्यात ती बाजीरावला शोधत आहे. ती म्हणतेय, “ना व्हॅक्सिन मिळत आहे, ना कपड्यांचं दुकान उघडत आहे. त्यामुळे मी भटकत आहे, ना मुंबई उघडतेय, ना लॉकडाउन हटतोय, मी खूप चिंतेत आहे. ना मी ‘खतरोंके खिलाडी’ मध्ये जाऊ शकले, ना मी विवाहीत असून मला माझा पती मिळाला,  एक चान्स होता मला माझ्या नवऱ्याला भेटायचा ‘नच बलिए’ मध्ये तो ही आता बंद होत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला कशी भेटू. तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.’

राखीचा नेहमीच असा भन्नाट अंदाज पाहायला मिळवतो. तिचे व्हिडीओज नेहमीच मनोरंजक ठरतात. लॉकडाउन असला तरीही राखी काही सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतच असते. काही मीडिया तिला स्पॉट करतो, तेव्हा राखी नेहमीच तिच्या खास आणि विनोदी शैलीत उत्तर देताना दिसते. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant