राखी सावंतला पंजाब पोलिसांनी केली अटक

राखी सावंतला पंजाब पोलिसांनी केली अटक

एका टीव्ही शोमध्ये लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा राखीवर आरोप आहे

  • Share this:

04 एप्रिल :  अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी अटक केलीये. हायकोर्टाने राखी सावंतच्या विरोधात अटक वाँरंट जारी केलं होतं. त्यानुसार आज तिला अटक करण्यात आलीये.

एका टीव्ही शोमध्ये लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा राखीवर आरोप आहे. 9 मार्चला या शोमध्ये राखीने वाल्मिकीवर अभद्र भाषेत टिप्पणी केली होती. त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टात न हजर झाल्यामुळे तिच्याविरोधात अखेर अटक वाँरंट जारी करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंतला अटक करून लुधियानाला नेण्यात येणार आहे. मध्यतंरी राखीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माफीही मागितली होती. पण कोर्टाच्या आदेशानंतर आज पंजाब पोलिसांनी तिला अटक केलीये.

First published: April 4, 2017, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading