मुंबई, 04 मार्च : भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांवर सिनेमा बनतो. त्यासंबंधी सतत बातम्या येत असतात. पहिल्यांदा राकेश शर्मांची भूमिका आमिर खान करणार अशी चर्चा होती. मग आलं शाहरुख खानचं नाव पुढे. त्यानंतर सुशांत सिंग राजपूत, विक्की कौशल आणि कार्तिक आर्यन ही नावंही समोर आली होती.
इतकी चर्चा होती की शाहरुख खाननं डाॅन 3चं शूटिंग संपवलं की लगेच हा सिनेमा घेणार, असं म्हटलं जात होतं. पण डाॅन 3चीही काही बातमी नाहीय. पण राकेश शर्मांवरचा सिनेमाही त्याच्या हातून निसटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार आता राकेश शर्मांची भूमिका रणबीर कपूर करणार आहे. लवकरच याची घोषणा होणार आहे.
अजून शाहरुखकडून सिनेमा सोडल्याबद्दल काही वक्तव्य केलं गेलं नाहीय. शाहरुख खानची कंपनी सध्या बदला सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा त्यांनी प्रोड्युस केलाय.
शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, ‘आता वातावरण बदलल्यासारखं वाटत आहे.’ याआधी शाहरुखने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना टॅग करून ‘मी तुमचा ‘बदला’ घ्यायला येत आहे. तयार रहा.’
याला उत्तर देताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘अरे शाहरुख ‘बदला’ घेण्याची वेळ निघून गेली.. आता सगळ्यांना ‘बदला’ दाखवण्याची वेळ आली आहे.’ सोशल मीडियावर बॉलिवूडच्या बादशहा आणि महानायकाचं हे संभाषण साऱ्यांनाच आवडलं होतं.
राकेश शर्मांवरचा 'सारे जहां से अच्छा' सिनेमाच्या आधी सुशांत सिंह राजपूत 'चंदा मामा दूर के' अशा एका अंतराळातील कथेवर अधारीत सिनेमात काम करणार होता. यासाठी सुशांतने नासाचा दौरासुद्धा केला होता पण काही कारणास्तव हा सिनेमा बंद पडला.
बाथटबवाल्या BOLD PHOTOमुळे प्रियांका झाली ट्रोल, लोकांनी विचारलं, किती नवरे होते?