राकेश मारिया यांच्या आयुष्यावर येतेय वेबसीरिज

माजी पोलिस कमिशनर आणि सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर आधारीत एक वेबसिरीज आपल्या भेटीला येणार आहे. राजीच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार ही वेबसीरिज दिग्दर्शित करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 06:20 PM IST

राकेश मारिया यांच्या आयुष्यावर येतेय वेबसीरिज

मुंबई, 06 आॅगस्ट : माजी पोलिस कमिशनर आणि सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर आधारीत एक वेबसिरीज आपल्या भेटीला येणार आहे. राजीच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार ही वेबसीरिज दिग्दर्शित करणार आहेत. यात 26/11 चा मुंबईतील अतिरेकी हल्ला, 1993 चे बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड असे अनेक विषय यात दाखवले जातील. राकेश मारिया यांच्यावरील ही वेबसीरिज, रिलायंस एन्टरटेन्मेंटच्या फॅण्टम फिल्म यांची निर्मिती असेल.

या वेबसीरिजबद्दल राकेश मारिया उत्सुक आहेत आणि यानिमित्ताने मुंबई पोलिस किती मोठी आव्हानं पेलतात हे प्रेक्षकांसमोर येईल, असं मारिया यांना वाटतं.यात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

राकेश मारिया म्हणाले, ' मी माझं आयुष्य पुन्हा एकदा जगणार आहे. मेघना गुलजारसारख्या संवेदशील दिग्दर्शिकेच्या हातात हा सिनेमा सोपवणार म्हटल्यावर मला एकदम रिलॅक्स वाटतंय.' मेघनाला हा सिनेमा करणं म्हणजे एक आव्हान वाटतं. सध्या ती अभिनेत्याच्या शोधात आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित राजी या सिनेमाने बॉलिवूडमधील 100 कोटी क्लबच्या सिनेमांच्या यादीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला होता. 11 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला 100 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 3 आठवडे लागले. मात्र वेगळी कथा, सशक्त सादरीकरण आणि आलिया भट्टचा अप्रतिम अभिनय यांच्या जोरावर या सिनेमाने आतापर्यंत 102 कोटी 50 लाख रूपयांचा बिझनेस केला.

एखाद्या महिला दिग्दर्शिकेने बनवलेला सिनेमा 100 कोटी रूपये कमावण्याची ही पहिलीच वेळ होती.कोणताही सणवार नसताना एवढी मोठी रक्कम मिळवणे ही बाब देखील कौतुकास्पद होती. त्यामुळेच आता या वेबसीरिजबद्दल उत्सुकता वाटतेय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close