मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Srivastava Health Update: ब्रेन डेड नव्हे तर...,कॉमेडीयनच्या मॅनेजरने दिली नवी अपडेट

Raju Srivastava Health Update: ब्रेन डेड नव्हे तर...,कॉमेडीयनच्या मॅनेजरने दिली नवी अपडेट

Raju Srivastv

Raju Srivastv

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेली आठवडाभर रुग्णलयात दाखल आहेत. सोशल मीडियावर सतत त्यांच्या विविध हेल्थ अपडेट समोर येत आहेत.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 19 ऑगस्ट-   प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेली आठवडाभर रुग्णलयात दाखल आहेत. सोशल मीडियावर सतत त्यांच्या विविध हेल्थ अपडेट समोर येत आहेत. दरम्यान काल राजू यांचं ब्रेन डेड झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यांच्याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. कॉमेडियनच्या मॅनेजरने याबाबतची अपडेट दिली आहे. गुरुवारी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली होती. कॉमेडियनचं ब्रेन डेड झालं असून त्यांची अवस्था गंभीर आहे. असं सांगण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची अफवासुद्धा पसरली होती. दरम्यान आता त्यांच्या मॅनेजरने समोर येत खरी परिस्थिती सांगितली आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. आज तकच्या रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी हेल्थ अपडेट देत सांगितलं की, कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे.आता काही सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. त्यांचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. इंजेक्शन आणि औषधांमुळे त्यांच्या ब्रेनवर सूज आली होती. त्यांचा ब्रेन डेड झालेला नाहीय ही एक अफवा आहे. ते सध्या सेमी कोमाच्या स्टेजवर आहेत. ते ठीक आहेत. यामध्ये जे नवीन डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यामुळे गोष्टी काही प्रमाणात साकारत्मक आहेत'. (हे वाचा:Raju Srivastava Health Update:'आता एखादा चमत्कारच...'; एहसान कुरेशीनी दिली राजू श्रीवास्तव यांच्याबाबत मोठी अपडेट ) 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टीदेखील झाली होती. परंतु त्यांनतरसुद्धा त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नव्हती. त्यांचा बीपी सतत कमी जास्त होत होता. शिवाय त्यांचा ब्रेनही उपचारास कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांसोबतच चाहतेही चिंतेत होते.
First published:

Tags: Comedian, Entertainment

पुढील बातम्या