मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी घोषित केलं ब्रेन डेड

Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी घोषित केलं ब्रेन डेड

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंं आहे.

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंं आहे.

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंं आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मागील एक आठवड्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके देखील मंदावले आहेत.  राजू श्रीवास्तव यांच्या वैयक्तिक सल्लागारानं दिलेल्या माहितीनुसार , डॉक्टरांकडून राजू यांना  ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आहे. आजतकनं याबाबत वृत्त दिलं आहे.  राजू यांची त्यांच्या प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांनी उपचारांचा हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. राजू श्रीवास्तव त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीच्या एम्स रुग्णलयात  दाखल झालं आहे.  यापूर्वी त्यांच्या हृदयाची दोन वेळा सर्जरी करण्यात आली आहेत.  त्यानंतर अचानक व्यायाम करत असताना ते खाली कोसळले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.  राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून आणि डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही. मात्र ते लवकरच राजू श्रीवास्तव यांचं मेडिकल बुलेटीन काढण्यात येणार आहे. हेही वाचा - Raju Srivastava Net Worth: लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे आहे इतकी संपत्ती राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याला एक आठवडा झाला आहे. मात्र अजूनही ते बेशुद्धच आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित काम करत होते मात्र आता हृदयाचे ठोके वाढल्याचं सांगण्यात येत आहेत. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा MRI करण्यात आला ज्यात त्यांच्या मेंदूमध्ये काही ठिकाणी काळे डाग आढळून आले. काळे डाग म्हणजेच त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. राजू यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. मात्र त्यांच्या नव्या हेल्थ अपडेटमुळे चाहत्यांची चिंताही चांगलीच वाढली आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

    पुढील बातम्या