मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची मोठी हेल्थ अपडेट आली समोर, जवळच्या मित्राने दिली माहिती

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची मोठी हेल्थ अपडेट आली समोर, जवळच्या मित्राने दिली माहिती

 लोकप्रिय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या चार दिवसांपासून रुग्णलयात दाखल आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

लोकप्रिय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या चार दिवसांपासून रुग्णलयात दाखल आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

लोकप्रिय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या चार दिवसांपासून रुग्णलयात दाखल आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 ऑगस्ट-   लोकप्रिय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या चार दिवसांपासून रुग्णलयात दाखल आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जगभरातील त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. परंतु रुग्णालयातून सतत त्यांच्या हेल्थ अपडेट समोर येत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सतत सांगितलं जात होतं.त्यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. परंतु आता काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचा खास मित्र आणि कॉमेडियन सुनील पालने याबाबत माहिती दिली आहे.त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत राजू यांची लेटेस्ट हेल्थ अपडेट दिली आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका असं आवाहनही केलं आहे. सुनील यांनी म्हटलं, "मित्रांनो, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवबद्दल अफवा सुरु आहेत. ते पूर्णपणे चुकीचं आहे. फेक न्यूज आहेत. त्यांच्या तब्येतीत बरीच स्थिरता आहे. सुधारणा होत आहे. आपल्या सर्व प्रार्थना कामी येत आहेत. हा एक चमत्कार घडला आहे असंच म्हणावं लागेल." सुनील पाल यांनी पुढं म्हटलं, “राजू लवकरच आपल्यामध्ये निरोगी आणि उत्तम परततील. आपण सर्वांनी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. राजू भाई यांनी नेहमीच लोकांना हसवलं आहे. आपण त्यांच्यासोबत असं काही घडू देणार नाही. राजू भाऊ लवकर या. आम्ही सर्व गजोधरच्या विनोदावर हसण्यासाठी तयार आहोत. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो, आपणा सर्वांना विनंती आहे की, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. राजू नेहमी स्वस्थ राहुदेत."असं म्हणत सुनील यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा:Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, 48 तासांनंतरही.... ) याआधी कॉमेडियन आणि अभिनेता शेखर सुमन यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली होती. राजूने आपली बोटं आणि खांदा हलवला असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहलं होतं की, "चांगली बातमी..राजूने आपली बोटं आणि खांद्यांची हालचाल केली.. डॉक्टरांच्या मते, गोष्टी थोड्या सकारात्मक दिसत आहेत. तुमची प्रार्थना काम करत आहे. प्रार्थना करत रहा." असं म्हणत त्यांनी सर्वांना दिलासा दिला होता.
First published:

Tags: Comedian, Entertainment

पुढील बातम्या