मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, 48 तासांनंतरही....

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, 48 तासांनंतरही....

 प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट-   प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. तब्बल तीन दिवसानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाहीय. रुग्णालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिलीय. राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सूत्राने 'पीटीआय-भाषा'ला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ते अजूनही व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत कोणताच सुधार झालेला नाहीय. या प्रसिद्ध कॉमेडियनवर एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक उपचार करत आहेत. शुक्रवारी रात्री श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहलं होतं, 'राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते यातून लवकरात लवकर ठीक व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत'.डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्व शुभचिंतकांचे त्यांच्या निरंतर प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.' कुटुंबाने लोकांना 'कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका' अशी विनंती केली होती. (हे वाचा: Amitabh Bachchan: अमिताभ यांचं गिफ्ट राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ठरणार रामबाण औषध? पाठवला खास ऑडिओ) बुधवारी सकाळी वर्कआउटदरम्यान ही घटना घडली. राजू श्रीवास्तव वर्कआउट करत होते. परंतु अचानक ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले. त्यांनतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक आहे. जगभरातील त्यांचे चाहते आणि सह कलाकार मित्र त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Comedian, Entertainment

    पुढील बातम्या