मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्याबाबत महत्वाची माहिती आली समोर, सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्याबाबत महत्वाची माहिती आली समोर, सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट

 प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यासाठी जगभरातील चाहते आणि सह-कलाकार मित्र प्रार्थना करत आहेत. सतत त्यांच्या हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यासाठी जगभरातील चाहते आणि सह-कलाकार मित्र प्रार्थना करत आहेत. सतत त्यांच्या हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यासाठी जगभरातील चाहते आणि सह-कलाकार मित्र प्रार्थना करत आहेत. सतत त्यांच्या हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई, 16 ऑगस्ट- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यासाठी जगभरातील चाहते आणि सह-कलाकार मित्र प्रार्थना करत आहेत. सतत त्यांच्या हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. नुकतंच त्यांचे सेक्रेटरी गरवीत नारंग यांनी एका निवेदनात सांगितलं आहे की, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते ठीक होत आहेत. राजू आयसीयूमध्येच असून व्हेंटिलेटरवर आहेत.

10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टीदेखील झाली होती. परंतु त्यांनतरसुद्धा त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नव्हती. त्यांचा बीपी सतत कमी जास्त होत होता. शिवाय त्यांचा ब्रेनही उपचारास कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांसोबतच चाहतेही चिंतेत होते.

न्यूज एजन्सी ANI च्या रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांचे सचिव गरवीत नारंग यांनी म्हटलं, “राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते लवकर पूर्णपणे ठीक व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.” यापूर्वी, राजूच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक निवेदन जारी करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांच्याबाबत पसरत असलेल्या अफांवर विश्वास न ठेवण्याचाही सल्ला यावेळी कुटुंबीयांनी दिला होता.

(हे वाचा:Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक माहिती समोर)

डॉक्टरांच्या मते, जेव्हा राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा 3 ते 4 मिनिटांसाठी खंडित झाला होता. त्यामुळे राजूच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने तो त्यांच्या मेंदूवर आघात झाला होता. त्यामुळे मेंदूकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. एमआरआय चाचणीत राजूच्या मेंदूला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याने मेंदूला झालेल्या दुखापतीतून ठीक होणं खूपच गुंतागुंतीचं असतं. त्यामुळे रुग्णांना यातून ठीक होण्यास खूप वेळ लागतो. मात्र आता राजू यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Comedian, Entertainment