Home /News /entertainment /

'मी ज्यांचा चाहता होतो तेच माझ्या वडिलांचे चाहते', राजू शेट्टी-सौरभ शेट्टींनी घेतली प्रवीण तरडेंची भेट

'मी ज्यांचा चाहता होतो तेच माझ्या वडिलांचे चाहते', राजू शेट्टी-सौरभ शेट्टींनी घेतली प्रवीण तरडेंची भेट

स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव' (Hambirrao) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

    मुंबई, 16 जून-  स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव'  (Hambirrao)  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाबाबत अभिनेते प्रवीण तरडे यांचं प्रचंड कौतुकदेखील झालं. सर्वच स्थरातून त्यांचं अभिनंदन केलं गेलं. दरम्यान आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी  (Raju Shetty) आणि त्यांचा मुलगा सौरभ शेट्टी  (Saurabh Shetty)  यांनी प्रवीण तरडे  (Pravin Tarde)  यांची खास भेट घेत चित्रपटाच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. याबाबत बोलताना सौरभ शेट्टी म्हणाले, ''काल कामानिमित्त राजू शेट्टी अर्थातच वडिलांच्या सोबत पुण्याला आलो होतो. आणि गाडीमध्ये बसताना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली. हंबीरराव मोहिते यांचाअभिनय करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांच्या अभिनयाचे मी खूप कौतुक केलं. आणि मी इच्छा व्यक्त केली की मला आज त्यांना भेटायचं आहे आणि साहेबांनी प्रवीण तरडे यांना फोन केला मालक देऊळ बंदचे निर्माते बापू वाणी यांच्या घरी भेटायचं ठरलं'. (हे वाचा: Man Udu Udu Zala: दीपूच्या भूमिकेसाठी आधी 'या' अभिनेत्रीने दिलं होतं ऑडिशन; आता त्याच मालिकेत साकारतेय वेगळी भूमिका) ''बापू वाणी यांच्या घरी पोहोचताच बापू आणि प्रवीण तरडे यांनी बाबांचं स्वागत करून घट्ट मिठी मारली आणि तेवढ्यात वडिलांनी माझी ओळख करून दिली. यावेळी प्रवीण तरडे म्हणाले "बाळा तू माझाच आहेस पण मी तुझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे ज्या पद्धतीने ते शेती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे" असं म्हणत त्यांनी वडीलांच्या कामाचं कौतुक केलं. तब्बल दीड-दोन तास आम्ही चर्चा केली गप्पा मारल्या आणि नंतर त्यांनी मला आणि वडिलांना सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील काही क्षण टीव्हीवर दाखवले. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल राजू शेट्टी यांनी प्रवीण तरडे यांचा सत्कार केला व शुभेच्छासुद्धा दिल्या''.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Raju shetty

    पुढील बातम्या