तुरुंगातून शिक्षा भोगून आला राजपाल यादव म्हणाला...

तुरुंगातून शिक्षा भोगून आला राजपाल यादव म्हणाला...

तुरुंगात नियम फार कठीण होते आणि आम्हा सर्वांना त्याचं पालन करावं लागायचं. तुरुंगातील इतर कैद्यांसोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचो.

  • Share this:

मुंबई, २७ मार्च- आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नुकताच तुरुंगातून सुटला. २०१० मध्ये राजपालने सिनेमासाठी एका कंपनीकडून पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण हे पाच कोटी रुपये तो दिलेल्या वेळेत परत करू शकला नाही. अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला तीन महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. आपली ही शिक्षा पूर्ण करून तो फेब्रुवारीच्या अखेरीस तुरुंगातून सुटला.

शिक्षा भोगून आल्यानंतर आता राजपालने प्रसारमाध्यमांसमोर आपलं मन मोकळं केलं. आयएएनएसशी बोलताना राजपाल म्हणाला की, ‘मी काही लोकांवर विश्वास दाखवला, पण त्यांनी माझा विश्वासघात केला. यामुळेच मी अडचणीत आलो. पण मला यावर अजून काही बोलायचं नाही. आयुष्यात आता मला पुढे जायचं आहे. कारण मला माहितीये की आयुष्याकडून मला अजून खूप काही मिळणार आहे.’

तो पुढे म्हणाला की, 'मला वाटतं की, कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो आणि न्यायव्यवस्थेपासून कोणी वाचू शकत नाही. मी आपल्या न्याय न्यायव्यवस्थेचा आदर करतो. त्यामुळे न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी पालन केलं. तुरुंगात नियम फार कठीण होते आणि आम्हा सर्वांना त्याचं पालन करावं लागायचं. तुरुंगातील इतर कैद्यांसोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचो. शिक्षेच्या काळात मी सकाळी व्यायाम करायचो, भाषणं द्यायचो. एक ग्रंथालय होतं तिथे जाऊन मी पुस्तकं वाचायचो.'

आपल्या आयुष्यातील या मोठ्या संकटाला तोंड दिल्यानंतर राजपाल पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या शिक्षेचा काळ संपवून आलेला राजपालने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, ‘लवकरच मी ‘टाइम टू डान्स’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. या सिनेमाचा काही भाग परदेशात चित्रीत झाला असून उरलेल्या भागाचं चित्रीकरण आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत.

याबरोबरच 'जाको राखे साइयां' सिनेमाचं काम सुरू आहे. डेव्हिड धवन आणि प्रियदर्शन या दोन्ही दिग्दर्शकांसोबत आगामी सिनेमांबाबत बोलणी सुरू आहेत. लवकरात लवकर सेटवर जाण्यासाठी मी अधीर झालो आहे.’

VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात

First published: March 27, 2019, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading