रजनीकांत यांच्या जावयाने गायलं मराठी गाणं!

रजनीकांत यांच्या जावयाने गायलं मराठी गाणं!

सासरे रजनिकांत 'पसायदान' सिनेमातून लवकरच मराठीत पदार्पण करणारेत म्हंटल्यावर जावई धनुषसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीत काम करण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

15 मार्च : सासरे रजनिकांत 'पसायदान' सिनेमातून लवकरच मराठीत पदार्पण करणारेत म्हंटल्यावर जावई धनुषसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीत काम करण्यास सज्ज झाला आहे. 'फ्लिकर' या मराठी सिनेमात धनुषच्या आवाजातलं गाणं असणार आहे. ज्याला संगीतबद्ध केलय प्रसिद्ध संगीतकार इलाया राजा यांनी.

धनुष हे गाणं गाणार म्हणून गाण्याचे बोल थोडे सोप्पे लिहिण्यात आले आहेत. तर धानुषने सुद्धा या गाण्यासाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण घेतलं आहे. शिवाय मराठी शब्दांचा उच्चारही तो शिकला आहे. दोन दिवसाचा रियाज करुन अखेर त्याने गाणं रेकॉर्ड केलं आहे.

काही वर्षांपूर्वी धनुषचं व्हाय धिस कोलाव्हेरी डी फारच व्हायरल झालं होतं. तसंच या गाण्यालासुद्धा चाहत्यांची पसंती मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: March 15, 2018, 1:38 PM IST

ताज्या बातम्या