विक्रांत सरंजामेची राजनंदिनी लवकरच अवतरणार

तुला पाहते रे मालिका आता एकदम रंजक वळणावर आलीय. विक्रांतचा सगळा भूतकाळच समोर येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 06:16 PM IST

विक्रांत सरंजामेची राजनंदिनी लवकरच अवतरणार

मुंबई, 26 मार्च : तुला पाहते रे मालिका आता एकदम रंजक वळणावर आलीय. बरेच दिवस ईशा आणि विक्रांतच्या गोड प्रेमाचा ओव्हरडोस झाला होता. आता विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. इतकंच काय तर विक्रांतचं खरं नाव गजा पाटील असल्याचंही उघड झालंय.

सरंजामेंच्या कंपनीत फ्राॅड झाला. तो करणाऱ्या व्यक्तीचं नाव ईशानं शोधून काढलं. ते म्हणजे गजा पाटील. विक्रांत आणि झेंडेंना तो एक धक्काच होता. हे नाव आईसाहेबांना कळलं की सगळंच उघड होणार. त्यामुळे विक्रांत घाबरलाय.

आता येत्या आठवड्यात मालिकेत बऱ्याच वेगवान घटना घडणार आहेत. राजनंदिनी म्हणजेच शिल्पा तुळसकर मालिकेत दिसणार आहे. राजनंदिनी ही आईसाहेबांची मुलगी आणि विक्रांत त्यांचा जावई आहे. हेही आता पुढच्या काही भागात उघड होणार आहे.

सुबोध भावेनं या मालिकेत चांगल्या आणि वाईट व्यक्तीच्या छटा तेवढ्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत.

या मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला होता, 'टीव्ही माझं आवडतं माध्यम आहे. ही मालिका खूपच लोकप्रिय झालीय. अगदी मराठी भाषिक नसलेलेही मला मालिका आवडते म्हणून मेसेज करतात. या मालिकेची सुरुवात आणि शेवट मला माहीत आहे. मी मालिका एंजाॅय करतोय.'

Loading...

निर्माता आणि कलाकार, सुबोधला कुठली भूमिका जास्त आवडते? यावर तो सांगतो, ' माध्यमाशी जोडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कुठलीही भूमिका असो.'

सुबोध सध्या खूपच बिझी आहे. मग तो त्याच्या फिटनेससाठी काय करतोय? 'मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही. जागरणं टाळतो. चांगली झोप घेतो. चालायला जातो. बाहेरचं जेवण कमी खातो. शक्यतो सेटवर घरचा डबा नेतो.'


सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...