'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

जेव्हा ऑडिशला पोहोचायचो तेव्हा धुळीमुळे पूर्ण चेहरा काळा झालेला असायचा. तेव्हा आम्ही गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ करायचो

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर- अभिनेता राजकुमारने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याने एकाहून एक सरस सिनेमांमध्ये अफलातून भूमिका साकारल्या आहेत. आता यश त्याच्या पायाशी लोळण घालत असलं तरी सुरुवातीला असं काही नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकुमारने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांना उजाळा दिला. तो म्हणाला की एक वेळ अशी होती की त्याच्याकडे जेवायला आणि रहायला पैसे नव्हते. राजकुमार रावचा जन्म हरियाणातील गुरुग्राम येथे झाला. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला.

 

View this post on Instagram

 

Dazzling away for #GarbaNight in Ahmedabad wore @mmalhotraworld and @dune_london tassel loafers! Styled by @thetyagiakshay Assisted by @mayuri_1192 @arpitajoshii #rajkummarrao #festive #MIC #stylefile #akshaytyagiforstylecell #dazzletassel #MadeInChina

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on

पिंकविला वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार म्हणाला की, 'एक वेळ अशी होती की माझ्याकडे शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. बँकेच्या खात्यात फक्त 18 रुपये होते. पैसे नसल्यामुळे दोन वर्ष शाळेची फी माझ्या शिक्षकांनी भरली. जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा घराचं भाडं आणि इतर खर्चांसाठी मला 15 ते 20 हजार रुपयांची गरज होती. पण माझ्याकडे एवढे पैसेच नव्हते. अनेकदा असं व्हायचं की खाण्यासाठीही माझ्याकडे काहीच नसायचं.

राजकुमार म्हणाला की, 'तो असा काळ होता जेव्हा मी आणि माझा मित्र विनोद बाइकवरून ऑडिशला जायचो. जेव्हा ऑडिशला पोहोचायचो तेव्हा धुळीमुळे पूर्ण चेहरा काळा झालेला असायचा. तेव्हा आम्ही गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ करायचो आणि ऑडिशन द्यायचो.'

 

View this post on Instagram

 

क्या आप हैं तैयार, बस बचे हैं दिन चार। #MadeInChina #IndiaKaJugaad

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजकुमार रावला खरी ओळख 'काय पो चे' सिनेमामुळे मिळाली. याआधी त्याने 'लव सेक्‍स और धोखा' आणि 'रागिनी एमएमएस' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. राजकुमार रावच्या नावावर 'न्यूटन', 'स्त्री', 'बरेली की बर्फी', 'सिटी लाइट्स', 'शाहिद', 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा', 'क्वीन', 'अलीगढ़', 'गैंग्स ऑफ वासेपुर' सारखे सिनेमे आहेत. लवकरच तो 'मेड इन चायना' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या