मुंबई, 10 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patrlekha) यांचे अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आणि एकत्र राहत आहेत. आता तो आपल्या प्रेमाला नवे नाव देणार आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये लवकरच लग्नाचा जल्लोष सुरू होणार आहे. बॉलीवूडमधील अनेक लव्ह बर्ड्सच्या लग्नाच्या चर्चांमध्ये बॉलीवूड स्टार राजकुमार-पत्रलेखा हे पहिले जोडपे आहे जे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाबद्दल आधी चर्चा होती की ते पिंक सिटी म्हणजेच जयपूरमध्ये आहे.मात्र आता त्यांच्या लग्नाचे ठिकाण बदलले आहे.
View this post on Instagram
या ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा-
राजकुमार राव आणि त्यांची दीर्घकाळाची मैत्रीण पत्रलेखा यांच्या लग्नाबाबत चर्चा रंगत आहे की, दोघांच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम 10, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. आजपासून दोघेही त्यांच्या लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त होणार आहेत.याआधी दोघांच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या की ते जयपूरमध्ये 7 फेरे घेणार आहेत, मात्र आता त्यांनी लग्नाची जागा बदलली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही आज चंदीगडमध्ये लग्न करणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाला फक्त अत्यंत जवळचे लोक येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील काही निवडक पाहुण्यांनाही त्यांनी आमंत्रित केले आहे.
View this post on Instagram
खास पाहुण्यांचा असणार सहभाग-
पत्रलेखाचे कुटुंब आधीच शिलाँगहून चंदीगडला गेले आहे. राजकुमार रावही आपल्या काही जवळच्या मित्रांसह येथे पोहोचणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेमुळे राजकुमार आणि पत्रलेखा यांना लग्न छोटे आणि खाजगी ठेवायचे होते. असे सूत्रांनी सांगितले. म्हणूनच त्यांनी यावेळी काही खास आणि मर्यादित लोकांना आमंत्रित केले आहे. लग्नासाठी चंदीगडची निवड केली आहे. मात्र, राजकुमार आणि पत्रलेखा यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
(हे वाचा:800 वर्षे जुन्या किल्ल्यात कतरिना-विकी बांधणार लग्नगाठ! पाहा Inside Photo)
राजकुमार पत्रलेखाला देणार खास भेट-
लग्नाच्या तयारीत राजकुमार पत्रलेखाला खास भेट देण्याची तयारी करत आहे. राजकुमार रावच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार पत्रलेखाला रोज प्रेमपत्र लिहायचा. त्याच्याकडून काही पत्रे ठेवत असत. कदाचित त्यांच्याकडून ठेवलेली पत्रे पत्रलेखाला दिली जातील जी खूपच रोमँटिक कल्पना आहे.राजकुमार राव आणि पत्रलेखा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे या दोघांनीही आपलं नातं कधीच लपवलं नाही. दोघेही एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. मीडियाशी बोलतानाही दोघंही अनेकदा एकमेकांचा उल्लेख करताना दिसले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment