राजकुमार राव (Rajkumar Rao) चा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच छलांग (Chhalaang) सिनेमातील 'केअर नी करदा' (Care Ni Karda) या गाण्याने यूट्यूबवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. हे गाणं 24 तासात सर्वाधिक पाहिलं गेलेलं गाणं ठरलं आहे.
मुंबई, 24 ऑक्टोबर: अॅमेझॉन प्राईमवर लवकरच छलांग (Chhalaang) ही सोशल कॉमेडी फिल्म प्रदर्शित होणार आहे. या फिल्मचं नवं गाणं रीलिज झालं आहे. 'केअर नी करदा' (Care Ni Karda) या गाण्याने यूट्यूबरवर नवा रेरॉर्ड बनवला आहे. हे गाणं 24 तासांत सर्वाधिक वेळा पाहिलं गेलेलं गाणं आहे. या गाण्याचे बोल आणि व्हिडीओ युट्यूब युझर्सना एवढं आवाडलं आहे की सर्वांच्या प्ले लिस्टमध्ये या गाण्याने स्थान मिळवलं आहे. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे या आधी जे रॅप साँग रीलिज झालं आहे ते राजकुमार राव (Rajkumar Rao)ने एकाच टेकमध्ये शूट केलं होतं. हे गाणं हनी सिंगचं होतं.
'केअर नी करदा' हे गाणं फिल्म रीलिज होण्याआधीच प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला, "मला खूप आनंद वाटतोय की प्रेक्षकांना 'केअर नी करदा' हे गाणं इतकं आवडलं आहे." या गाण्यामध्ये राजकुमार राव आणि अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) रोमॅन्टिंक अंदाजात दिसणार आहेत.
छलांग सिनेमामध्ये नुसरत भरुचा आणि राजकुमार राव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्फाज, यो यो हनी सिंग आणि होमी दिल्लीवाला हे या गाण्याचे गीतकार आहेत तर स्वीजात बरार याने ‘केअर नी करदा’चं संगीत दिलं आहे. बरेच दिवसांनी एक छान कॉमेडी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी छलांग सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच अजय देवगण, लव रंजन आणि अंकुर गर्ग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 13 नोव्हेंबरला फिल्म अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज होणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.