अभिनेता राजकुमार रावचा एशिया पॅसिफिक अॅवाॅर्डनं गौरव

अभिनेता राजकुमार रावचा एशिया पॅसिफिक अॅवाॅर्डनं गौरव

'न्यूटन'मधल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. ब्रिसबन इथे हा सोहळा रंगला होता.

  • Share this:

24 नोव्हेंबर : अभिनेता राजकुमार राव याच्या यशात आणखी एक मोरपिस खोवलं गेलंय. राजकुमारला या वर्षीचा एशिया पॅसिफिक अॅवाॅर्ड मिळालाय. 'न्यूटन'मधल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. ब्रिसबन इथे हा सोहळा रंगला होता.

याच सोहळ्यात न्यूटनला सर्वोत्कृष्ट पटकथेचाही पुरस्कार मिळालाय. 'न्यूटन' सिनेमाची आॅस्करसाठी भारताकडून निवडही झालीय.

पुरस्कार स्वीकारताना राजकुमार म्हणाला, ' चांगली कथा आणि चांगली कामं म्हणून हा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे हा अॅवाॅर्ड सिनेमाचा आहे.'

राजकुमार रावनं हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केलाय.

First published: November 24, 2017, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading