मुंबई, 18 जानेवारी : 'लाईफ इन अ मेट्रो' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच चित्रपटाची एक झलक फोटोतून समोर आली आहे. लाईफ इन अ मेट्रो सिनेमा प्रेक्षकांना फारच आवडला होता. चित्रपटाची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून जातात. त्यामुळे दिग्दर्शक अनुराग बासूने चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची निर्मिती करायचं ठरवलं आहे.
चित्रपटाच्या सिक्वेलचा फोटो नुकताच समोर आला आहे. राजकुमार राव आणि फातिमा सना शेख चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये फातिमा आणि राजकुमार फारच सुंदर दिसत आहेत. दोघांचाही लुक सिनेमात अतिशय वेगळा असल्याचं दिसतंय. कारण ते दोघेही 80 च्या दशकातली भूमिका करत असल्याचा अंदाज त्यांच्या कपड्यांवरून येत आहे.
राजकुमार रावने सिनेमातील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, ‘लवकरच तुमच्यासमोर येणार आहोत पण तोपर्यंत तुमच्यासाठी ही एक खास झलक, #AnuragBasu sir’s next with @fattysanashaikh’
लाईफ इन अ मेट्रो सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची कास्टिंग होती. सिनेमात वेगवेगळ्या वयोगटातील जोडप्यांच्या प्रेमकथा होत्या. तसेच 'लाईफ इन अ मेट्रो'च्य' सिक्वेलमध्ये या दोन कलाकारांच्या शिवाय अनेक दिग्गज सेलिब्रिटी असणार आहेत. अभिषेक बच्चन, परिणिती चोप्रा, पंकज त्रिपाठी आणि आदित्य रॉय कपूर अशी दमदार कालाकारांच्या वेगवेगळ्या प्रेमकथा सिनेमात असणार आहेत.
बहुत जल्दी सामने आयेंगे आप लोगों के। तब तक के लिए एक झलक। #AnuragBasu sir’s next with @fattysanashaikh pic.twitter.com/hL7ocqpOXO
— Rajkummar Rao (@RajkummarRao) January 17, 2019