मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'रिया चक्रवर्ती माझी...', त्या फोटोबाबत रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं दिलं स्पष्टीकरण

'रिया चक्रवर्ती माझी...', त्या फोटोबाबत रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं दिलं स्पष्टीकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty)  राजीव लक्ष्मणसोबतचा (Rajiv Lakshman) फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या.

 मुंबई, 08 जानेवारी : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput)  गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं  (Rhea Chakraborty) आता आपलं आयुष्य नव्यानं सुरू केलं आहे. त्यामुळे ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे सध्या रोडिज फेम राजीव लक्ष्मण  (Rajiv Lakshman)  सोबत काढलेल्या फोटोमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अखेर राजीव लक्ष्मणनं हा फोटो हटवला आहे आणि याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.

राजीव लक्ष्मणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रियासोबतचा एका फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रियानं राजीवला मिठी मारून हसताना दिसत आहे. शिवाय राजीवनं हा फोटो शेअर करताना रियाला 'My Girl' असं म्हटलं.

हा फोटो पाहताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. रिया इतक्या लगेच मुव्ह ऑन करू लागल्यानं नेटिझन्सनी तिला ट्रोल केलं. त्यामुळे राजीवनं हा फोटो लगेच हटवला आहे. त्यानं दुसरी पोस्ट शेअर करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

राजीव म्हणाला, "मला वाटतं मी चुकीचा शब्द वापरला आणि कोणत्याही कारणाशिवाय अडचण ओढावून घेतली आहे. रिया माझी जुनी मैत्रीण आहे आणि तिला पुन्हा भेटल्यानं मी खूप आनंदी आहे. तिचं सर्व चांगलंच व्हावं अशीच प्रार्थना मी करतो"

हे वाचा - 'माझं शोषण होतंय, आता तुमची वेळ', अभिनेत्री कंगना रणौतनं शेअर केला VIDEO

सुशांतच्या मृत्यूनंतर  2020 नंतर रियाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. ड्रग्ज केसमध्ये रिया अडकली आणि तिला तुरुंगवासही झाला. महिनाभरानंतर तिची तुरुंगातून सुटका झाली.

First published:

Tags: Bollywood, Rhea chakraborty, Sushant sing rajput